शेतीच्या वादातून भावाने केला भावाचा खून ; खंडाळा येथील घटना

खंडाळा : आजकाल शेती – संपत्तीच्या वादातून लोक आपली नाती विसरतात आणि एकमेकांच्या जीवावर उठतात. अशीच एक घटना खंडाळा तालुक्यातील घडली आहे. यामध्ये शेतीच्या झालेल्या वादातून आरोपीने आपल्या चुलत भावाची हत्या केली आहे.
सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा तालुक्यातील आहीरे या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या धायगुडे परिवारातील वडिलोपार्जित असलेल्या जमिनीच्या वादातून नेहमीच धूसपुस सुरू होती.संशयीत आरोपी ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे
व मयत मोहन सुरेश धायगुडे हे चुलत भाऊ आहेत नेहमीच शेतीच्या वादातून या दोघांमध्ये वाद विवाद होत होता. आज शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात संशयित आरोपी यांनी आपल्याच चुलत भाऊ असलेले मोहन सुरेश धायगुडे यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे अहिरे गावात खळबळ उडाली आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त