कोयनेत २८ टक्के, कण्हेर १४ टक्के तर उरमोडी ९ टक्के पाणी साठा.साता-यातील धरणांनी गाठला तळ
Satara News Team
- Sat 11th May 2024 12:15 pm
- बातमी शेयर करा
सातारा : जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत असल्याने धरणे रिकामी होऊ लागली आहेत. त्यामुळे अनेक धरणांनी तळ गाठला आहे. उरमोडी धरणात अवघा ९ तर कण्हेरमध्ये १४ आणि कोयनेत २८ टक्केच साठा राहिला आहे. त्यातच मागणी आणखी वाढल्यास धरणातील साठा संपुष्टात येणार असल्याने सर्वांचेच डोळे मान्सूनकडे लागले आहेत.
जिल्ह्यातील शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पर्जन्यमान होते. यावरच जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची मदार असते. मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्यातच अपुरा पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे ही भरली नाहीत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातही ९५ टीएमसीपर्यंतच साठा पोहोचलेला. परिणामी सिंचनासाठी सतत मागणी वाढत गेली.

सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी आजही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या ३१०० क्यूसेकने सांगलीसाठी पाणी सोडले जात आहे. याच धरणात आता २८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ३३.१८ टीएमसीच पाणी आहे. तर उरमोडी धरणावर सातारा आणि माण, खटाव हे दुष्काळी तालुके अवलंबून आहेत.
जिल्ह्यातील धरणांची स्थिती (टीएमसीमध्ये)
धरण - सध्याचा साठा - टक्केवारी - एकूण पाणीसाठा
कोयना -३३.१८ - २८.०२ - १०५.२५
धोम - ५.४१ - ३०.७८ - १३.५०
बलकवडी - ०.८२ - १७.७८ - ४.०८
कण्हेर - १.८४ - १३.९३ - १०.१०
उरमोडी - ०.९० - ९.०४ - ९.९६
तारळी - २.०८ - ३५.४३ - ५.८५
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 11th May 2024 12:15 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 11th May 2024 12:15 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 11th May 2024 12:15 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sat 11th May 2024 12:15 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sat 11th May 2024 12:15 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sat 11th May 2024 12:15 pm
संबंधित बातम्या
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Sat 11th May 2024 12:15 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 11th May 2024 12:15 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Sat 11th May 2024 12:15 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sat 11th May 2024 12:15 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Sat 11th May 2024 12:15 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Sat 11th May 2024 12:15 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Sat 11th May 2024 12:15 pm











