तुमचे ते काम आणी आमचा तो स्टंट असा शोध आ.शिवेंद्रराजेंना वाटत आहे ...खा.छ. उदयनराजे
प्रकाश शिंदे- Thu 28th Jul 2022 03:39 pm
- बातमी शेयर करा
सातारा : जसजशी नगरपालिका निवडणूक जवळ येत आहे तस तस सातारच राजकारण पन तापायला लागल आहे गेल्या काही दिवसांपासून दोनी राज्यांमधे नेहमी प्रमाणेच युध्द पुन्हा सुरु झाले आहे आज खा.उदयनराजे यांनी एक पत्रक काढून आ.शिवेंद्रराजे यांना सडेतोड उत्तर दिल आहे ज्या मध्ये जय किंवा पराजय अपेक्षित असते, त्यालाच निवडणुका म्हणतात. आमचा पराभव आम्ही खुल्या मनाने स्विकारला आहे. तसेच ज्यावेळी जय झाला त्यावेळी हुरळुनही गेलो नाही. आमच्या लोकसभेतील पराभवाची कारणं तोंड वर करून विचारताय तर आधी तुमच्या विधानसभेतील पोटनिवडणुकीच्या पराभवाची कारणं दया. ती जी कारणे असतील तीच आमची समजा असा सडेतोड पलटवार करताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी, बॅन्क कायदेशीर मर्ज केली असे म्हणता, तर मर्ज करण्यासाठीच बॅन्क स्थापन केली होती का? एक बॅन्क तुमच्या अंदाधुंद भ्रष्ट कारभाराने बुडीत काढली पण त्याकरीता दुस-या बॅन्केचाही गळा घोटला, सहकारी बझारचे रेस्टॉरेट केले, पुढे रेस्टॉरंटही बंद पाडले हे प्रकार सहकारातील तत्वज्ञानात येत नाही परंतु हाच तुमचा खरा वारसा आहे हे तुम्ही दाखवून दिले आहे अश्या खरमरीत शब्दात जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथून दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, आमचा आणि तुमचा मार्ग वेगळा तर आहेच, तसेच अन्य काही बाबी आणि उदिष्ट देखिल वेगळे आहे. आम्ही जनसामान्यांना आमचे समजतो, जनतेला जनार्दन समजतो. आम्ही निस्वार्थी मनाने कार्यरत राहतो, तुमचं तसं नाही, तुम्ही स्वार्थापोटी जनसामान्यांना जवळ करता, जनतेचे किंवा कार्यकर्त्यांचे विक पॉईट हेरुन, त्यांच्या नाड्या आवळता. जनतेमुळे आम्ही आहोत ही भावना आमची तर जनता आमच्यामुळे आहे अशी भावना तुमची सहकारी संस्था सभासदांच्या मालकीच्या आणि उध्दारासाठी आहेत ही आमची धारणा तर सहकार म्हणजे स्वतःची खाजगी मालमत्ता ही तुमची धारणा असा जो काही फरक आहे तो मुलभूत फरक आहे. त्यामुळे दोघांमधील विचारांची उंची व खोली सुध्दा वेगळी आहे. दुस-याच्या पराभवाची कारणे विचारणारे तुम्ही स्वतःला अहंकारी आणि अहंमन्य देखील समजता आहात. अहंकाराने सर्वनाश होता हे तुम्ही जाणिवपूर्वक विसरत आहात. अजिंक्यतारा कारखाना निवडणुक लागल्यावर एकदा भ्रष्ट कारभाराबाबतची अपराधी भावना घेवून तुम्ही आमच्याकडे आला होता. निवडणुकीत लक्ष घालू नका. मी सर्व चुकांची दुरुस्ती करतो असे देखिल म्हणाला होता हे इतक्या लवकर कसे विसरलात? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर आम्ही छाती काढून सभासदांपुढे गेलो तर तुमची छाती जावून, नुसत्या बरकडया राहतील याची पहिल्यांदा नोंद घ्या आणि मग आमच्या छातीकडे या. तुमचे ते काम आणि आमचा तो स्टंट असा शोध तुम्ही लावलेला आहे ती तुमची वैचारिक दिवाळखोरी आहे असे नमुद करुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, आम्ही ज्यावेळी एकादा प्रकल्प अंतिम टप्यात येतो त्यावेळी त्याची निधीच्या आकडेवारीसह आणि तांत्रिक बाबींसह आम्ही माहीती देत असतो. तुमच्या सारखे आता प्रस्ताव मुख्याधिकारी यांना दिला. लगेच त्याचा फोटो आणि बातमी, आता तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे आला, त्याचा फोटा आणि बातमी, आता तो प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे गेला, त्याचा फोटो आणि बातमी आता तो प्रस्ताव सचिवांकडे गेला त्याची बातमी आणि त्याचा तुमचा फोटो, आता तो प्रस्ताव जर दादांकडे असेल तर त्याची बातमी आणि यांचा फोटो. परंतु अन्य महोदयांकडे असेल तर मात्र यांना तेथे कोणी विचारतच नाही त्यामुळे त्याची बातमी नाही आणि फोटोसुध्दा नाही. तुम्ही परफेक्शनिस्ट नव्हे तर फंक्शनिष्ट आहात. असला प्रकार तुमचा तुम्हालाच शोभुत दिसतो.. हा फरक सुध्दा एक आपल्या मार्गातील वेगळेपण दाखवणारा आहे. सातारा-कराड हे जंक्शन नाही त्यामुळे येथून गाडी सुरु करता येत नाही याचे देखिल यांना भान नाही. उचल जीभ लाब टाळयाला असा यांचा एकंदरीत नखरा आहे. प्लॅटफॉर्म लांबी, प्लॅटफॉर्म शेड, लोहमार्गाचे दुहरीकरण, विद्युतीकरण प्रवाश्यांच्या सुविधांमधील सुधारणा अशी किती तरी कामे केली आहेत. १०-१२ वर्षापूर्वी फक्त ९ गाडयांची ये-जा सुरु होती. आज रोजी १९ गाडयांची ये-जा सुरु आहे. म्हणजे पूर्वीच्या अप अॅन्ड डावुन १८ गाड्यांच्या तुलनेत ३८ रेल्वेगाडया आज सातारा कराड मधुन धावतायत, एकदा डोळ्यात अंजन घालुन बघा म्हणजे दिसेल आणि समजेल, सातारा शहरात रस्त्याची कामे साविआ मार्फत वेळोवेळी झाली आहेत. आता पावसाळयात काही ठिकाणी खडडे पडले आहेत त्याचे पॅचिंगचे काम प्रशासनाने हाती घ्यावे अशी सूचना एक लोकप्रतिनिधी म्हणून केली आहे. आमच्या घरासमोरील रस्ता झाला किंवा नाही झाला तरी सामन्य सातारकरांच्या गल्लीबोळातील रस्ते झाले पाहीजेत अशी आमची प्रशासनाला विनंती सूचना आहे. विकासपुरुष कदाचित तुम्हीच आहात. कारण विकासरत्नांचा वारसा लाभलेला आहे. आम्ही या मातीचे ऋण मानणारे आणि समाजामुळे आमचे स्थान आहे ही ठाम धारणा असणारे सर्वसामान्य जनतेचे आहोत. नगरपालिकेविषयी बिनबुडाचे आरोप करणे निरर्थक आहे. सातारकरांनी आमच्याकडे सत्ता सोपवली म्हणून आरोप होणार हे अपेक्षित आहे. निवडणुकीमध्ये नगरपरिषदेच्या कारभाराबाबत जनता जनार्दन जो कौल देईल तो आम्हाला मान्य असेल तथापि त्यांच्या आरोपांना आम्ही किंवा सातारकर कधीच भीक घालणार नाहीत असे देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फटकारले आहे.
udaynraje
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 28th Jul 2022 03:39 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 28th Jul 2022 03:39 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Thu 28th Jul 2022 03:39 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 28th Jul 2022 03:39 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 28th Jul 2022 03:39 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 28th Jul 2022 03:39 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Thu 28th Jul 2022 03:39 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 28th Jul 2022 03:39 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Thu 28th Jul 2022 03:39 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Thu 28th Jul 2022 03:39 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Thu 28th Jul 2022 03:39 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Thu 28th Jul 2022 03:39 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Thu 28th Jul 2022 03:39 pm













