श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी व पादुका परिक्रमा गुरुवारी मेढ्यात
Satara News Team
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
- बातमी शेयर करा
मेढा : श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ अन्नछत्रमंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या " भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " असा आशीर्वाद देऊन सदमार्गावर आणि नितीमत्तेने वागणाऱ्या भक्ताचे कल्याण करणाऱ्या गुरू दत्तांचे चौथे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज पादुका व पालखी सोहळा परिक्रमेचे गुरूवार दि. १५ फेब्रुवारी रोजी मेढा शहरात सकाळी १० वाजता आगमन होत असून पादुका दर्शनाचा लाभ स्वामी भक्तांनी घ्यावा असे आवाहन स्वामी सेवेकारांच्या वतीने करण्यात आले आहे.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने ज्या स्वामी भक्तांना स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाता येत नाही त्यांना स्वामी दर्शन व्हावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात स्वामींच्या पादुका व पालखी सोहळा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.यावर्षी मेढा येथे श्री स्वामी समर्थ महाराज पालखी व पादुकांचे आगमन सकाळी १०.०० वा. छ.शिवाजी महाराज चौकात होणार आहे.आगमन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वागत व पूजन होईल. पादुका पुजन झाल्यावर ढोल ताशांच्या गजरात मेढा शहरातून पालखी पादुका मिरवणूक काढण्यात येणार आहे दुपारी ११.३० वा हार्डवेअरचे व्यापारी सुधाकर मोरे यांच्या निवासस्थानी पालखी येईल त्या ठिकाणी अभिषेक व पूजा झाल्यानंतर आरती होईल
आरती नंतर भाविकांना स्वामींचे दर्शन घेता येईल दुपारी ३ वाजता पालखी परिक्रमा सातारला मार्गस्थ होणार आहे तरी मेढा पंचक्रोशीतील स्वामी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ भक्त मंडळींकडून करण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 13th Feb 2024 05:15 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 13th Feb 2024 05:15 pm













