साताऱ्यात चक्क खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात आम आदमी पार्टीच्या कागदी होड्या

सातारा  : सातारा शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ऐन पावसाळ्यात वाहनधारकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांकडे पायिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मंगळवारी दुपारी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी चक्क खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून व वृक्षारोपण करून पालिकेच्या कारभाराचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.

सातारा शहरात सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून जाताना खडडा चुकवताना अपघात होत आहेत. सातारा पालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांचे पावसापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अंतर्गत रस्त्यांना लागलेले खड्ड्यांचे ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून या खड्ड्यांचे आकारमान वाढत चालले असून, खड्ड्यांत वाहने आदळून वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत.

शहरातील जुना आरटी चौक, तांदूळ आळी, फुटका तलाव परिसर, काळा दगड परिसर या भागात अशा खड्ड्यांची संख्या मोठी आहे. पालिकेने या खड्ड्यांची अद्याप डागडुजी न केल्याने मंगळवारी दुपारी आम आदमी पार्टीचे सागर भोगावकर व कार्यकर्त्यांनी जुना आरटीओ चौकातील खड्ड्यांत कागदी होड्या सोडून व वृक्षारोपण करून पालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदविला. या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त