कराड व कोरेगाव तालुक्याला जोडणारी वाठारखिंड पाडळी ते वाठार दरम्यान रस्त्यावर दरड कोसळली
Satara News Team
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
- बातमी शेयर करा
वाठार किरोली : कराड व कोरेगाव तालुक्याला जोडणाऱ्या वाठार किरोली खिंडीत दरड कोसळल्याने दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने यावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्याने जीवित हानी झाली नाही. सुरुवातीला काही नागरिकांनी एका बाजूने दुचाकीसाठी रस्ता मोकळा केला होता. मात्र, मोठ्या प्रमाणात डोंगराचा भाग रस्त्यावर पडल्याने वाहतूक दोन तास ठप्प होती.सातारा जिल्ह्यातील कराड व कोरेगाव तालुक्याला जोडणारी वाठारखिंड पाडळी ते वाठार दरम्यान रस्त्यावर आहे. काही वर्षांपूर्वी या खिंडीतला रस्ता मोठ्या उंचावर होता. तो चढ कमी करण्याचे काम करण्यात आले होते. पश्चिमेकडील बाजूला डोंगराचा भाग असल्याने हा भाग गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे ढिसूळ झाला होता. या खिंडीतल्या रस्त्याचा भाग काल दुपारी रस्त्यावर पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. त्यामुळे कराड कोरेगाव मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प होती.या मार्गावर सुरुवातीला काही प्रवाशांनी एका बाजूने दुचाकी जाईल. एवढा रस्ता सुरू करून मार्ग मोकळा केला. मात्र दगड व मुरमाचा मोठा ढिगारा रस्त्यावर पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. दरम्यान वाठार किरोलीच्या विकास गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने पडलेले दगड व मुरूम हलवल्यानंतर रस्ता पूर्ववत सुरू झाला. दरम्यान या खिंडीतील ठिसूळ झालेला डोंगराचा भाग काढून टाकावा, अशी मागणी परिसरातील वाहनधारक व नागरिकांमधून होत आहे.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 31st Jul 2023 12:23 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 31st Jul 2023 12:23 pm













