मणीपूरच्या घटनेचा साताऱ्यात तीव्र निषेध.. रयत स्वाभिमानी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

सातारा  :   महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या रयत स्वाभिमानी संघटनेतर्फे  गतसप्ताहातील मणीपूरमधील घृणास्पद घटनेचा निषेध करीत प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.    

 मणिपूर राज्य चार मे 2023 रोजी जात समुदायातील संघर्षातून दोन महिलांची जमावाने निर्वस्त्र धिंड काढण्याचा प्रकार मानवतेला काळीमा फसणार आहे. याप्रकरणी मा. सुप्रीम कोर्ट, मा. पंतप्रधान आदी विविध मान्यवरांनी निषेध व्यक्त केला आहे. मात्र या प्रकरणी दोषींना शोधून काढून त्यांच्यावर ठोस कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी आमच्या संघटनेतर्फे आम्ही करीत आहोत, असे सागरदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. संबंधित घटनेतील संशयित आरोपी कोणीही असले तरी, त्यांची दया माया न करता त्यांच्यावर कायद्यानुसार अधिकाधिक कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, मुळातच अशी घटना हे दुर्मिळात दुर्मिळ उदाहरण आहे. त्यामुळे या घटनेस कारणीभूत असणाऱ्या असामाजिक तत्त्वांना ठेचून काढण्यासाठी पुढे होण्यास आमची संघटना कधीही मागे हटणार नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे.   जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना या निवेदनाची प्रत सागरदादा पवार व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सादर केली. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यासाठी व्यापक जनरेटा उभा राहावा म्हणून आम्ही आमची शक्ती वापरण्यास तयार आहोत. संबंधितांना भर चौकात निर्वस्त्र उलटे टांगून मिरच्यांची धुरी देण्यात यावी, तसेच त्यांच्या अंगावर मिरची पावडर, विष्टा, मलमूत्र टाकून त्यांच्या घृणास्पद कृत्याची सतत तडफडत राहण्याची शिक्षा व्हावी, यासाठी वरिष्ठ कार्यालयास आमच्या सूचना लेखी स्वरूपात कळवाव्यात, अशी आपणास विनंती करीत आहोत, अशा संतप्त प्रतिक्रियाही यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

     या वेळी प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार,  जिल्हाध्यक्ष सुशीलभाऊ कदम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वातीताई माने, जिल्हा सचिव अभय जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रवक्ता आयु. संदीपभाऊ जाधव जिल्हा सरचिटणीस निहाल इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष वंदनाताई पवार, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गुंजवटे, युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष  सपनाताई भोसले, जिल्हा संघटक अविनाश दडस, जिल्हा उपाध्यक्ष सुमितभाऊ साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष आदित्य चौधरी, शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विजय माने, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष विक्रम लावंड, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कार्तिक ढमाळ, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भोसले, धर्मनाथ लावंड, सौ. सुनीतीताई धायगुडे, सौ. वंदना सुनील पवार, सौ. प्रमिला मनोज यादव, शोभा अंकुश लोमटे, मुमताज शेख, सपना खंडागळे, सुशीला गाढवे, सविता अहिरेकर, अनिता कोकरे, मयुरी चव्हाण, प्रज्ञा गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला