पाचगणीतील सील केलेल्या हॉटेल फर्नला उच्च न्यायालयाचा दणका, ठोठावला दहा लाखांचा दंड
- Satara News Team
- Thu 11th Jul 2024 09:56 am
- बातमी शेयर करा
पांचगणी : निवासासाठी असणारी इमारत व्यावसायासाठी वापरणाऱ्या पांचगणी येथील हॉटेल द फर्नला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सील ठोकल्याच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका चांदणी रियाल्टी यांनी पांचगणी नगरपालिके विरोधात दिली होती. ही याचिका उच्च नायायलायाने फेटाळून हॉटेल फर्नला दहा लाखाचा दंड ठोठाउन चांगलाच दणका दिला आहे. या निकालामुळे पांचगणी महाबळेश्वर मध्ये खळबळ उडाली आहे. या दणक्याने इतर अशा इमारती वापरकर्ते याची गंभीर दखल घेतील असा विश्वास पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले. पांचगणी येथील फायनल प्लॉट नंबर ५५५ या मिळकतीत बांधलेली इमारत ही रहीवासासाठी असताना तिचा बिनदिक्कतपणे व्यवसायासाठी वापर केल्याचे निदर्शनास आल्याने पांचगणी नगरपालिकेने ही इमारतच मे महिन्यात कडेकोट बंदोबस्तात सील केली होती. या मिळकतीचे सीलबंद केलेल्या कारवाई बाबत चांदणी रियाल्टी यांनी पाचगणी नगरपालिके विरोधात मा. न्यायालयात दाद मागितली होती. ही याचिकाफेटाळताना मुख्य इमारतीच्या टेरेस वरील विनापरवाना शेड 3 महिन्याचे आत त्यांनी स्वतः स्वखर्चाने काढून घ्यावे. आणि इमारतीचा वापर मंजूर नकाशात दाखवल्याप्रमाणे स्लोपिंग रूफ करावे. फायनल प्लॉट नंबर ५५५ मधील फक्त मुख्य इमारतीचे सील काढण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. तर मागील बाजूला असणारी सर्व्हे नंबर 14/A/2 चे मिळकतीचे सीलबंद कायम राहणार आहे. परंतु मुख्य इमारतीचे सील काढताना सदर इमारत वापर हा फक्त रहीवांसासाठीच करणे बंधनकारक राहील. इमारतीची उंची 30 फूट मर्यादेत असेल.
याचिकाकर्त्याने ब्रेड अँड बटर चे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे दोन रूमचे लायसन काढून तब्बल ७० रूमच्या माध्यमातून व्यावसायिक वापर केला यामुळे उच्च न्यायालयाने दहा लाख रुपयांचा निधी किर्तीकर लॉ लायब्ररी साठी दोन आठवड्यात जमा करावेत. असे आदेश पारित करण्यात आल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले.
याचिकाकर्त्याने हॉटेल व्यवसाय बंद केल्याबाबत "ग्रँट व्हिक्टोरिया द फर्न रिसॉर्ट अँड स्पा, पाचगणी,” पुढील आदेश येईपर्यंत बंद आहे. अशी नोटीस पुणे आणि सातारा जिल्ह्यातील वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रसिध्दी द्यावी तसेच आपली पांचगणी येथील वेबसाइट बंद करूनप्रसिध्दी द्यावी तसेच आपली पांचगणी येथील वेबसाइट बंद करून अधिकृतपणे वेबसाइटवर याबाबत जाहीर प्रकटीकरण करावे. सील काढलेल्या जागेचा वापर फक्त रहीवासासाठी व्हावा आणि सर्व्हे नंबर 14/A/2 चे मिळकतीचे सीलबंद स्थिती पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवावे. त्या ठिकाणीं कुठला ही वापर सद्यस्थिती मध्ये करता येणार नाही. असेही शेवटी या न्यायालयाच्या निकालात म्हंटले असल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले.
द फर्न हे हॉटेल व्यवसायातील देशातील अग्रणी फर्म असून उच्च न्यायालयात या फर्मने पांचगणी नगरपालिके विरुद्ध दाद मागून मोठा दांडगावा केला. परंतु खरी परिस्थिती पाहून उच्च न्यायालयाने सदर याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले आहे. आणि या निकालाने या बड्या फर्म कंपनीला चांगलाच दणका बसल्याने सर्वत्र या निकालाची चर्चा चालू आहे. नगरपालिकेने याबाबत आपली बाजू ठासून मांडल्याने बड्या फर्मला मोठा झटका बसला आहे.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा पांचगणी- महाबळेश्वर मधील अनेक व्यावसायिकांनी धसका घेतला असून अशा इमारती वापरकर्त्यांना आता नगरपालिका लक्ष करणार काय याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.
स्थानिक बातम्या
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घरी परतत असतानाच ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम यांचा अपघाती मृत्यू
- Thu 11th Jul 2024 09:56 am
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Thu 11th Jul 2024 09:56 am
जिल्ह्यात बारा वाजेपर्यंत मतदान संत गतीनेच
- Thu 11th Jul 2024 09:56 am
शरद पवारांनी त्या काळात काँग्रेस फोडली ती गद्दारी नव्हती का ? ...उदयनराजे
- Thu 11th Jul 2024 09:56 am
255 फलटण विधानसभा मतदारसंघात शासकीय यंत्रणा सुसज्ज
- Thu 11th Jul 2024 09:56 am
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Thu 11th Jul 2024 09:56 am
संबंधित बातम्या
-
केंद्रीय गृहमंत्री दक्षतापदक 2024 फलटण विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री राहुल धस यांना जाहीर.
- Thu 11th Jul 2024 09:56 am
-
पांचगणी मुख्याअधिकारी यांना उच्चन्यायलयाची नोटीस
- Thu 11th Jul 2024 09:56 am
-
सातारा नगर पालिकेच्या दोन अभियंत्यांची बदली
- Thu 11th Jul 2024 09:56 am
-
आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही
- Thu 11th Jul 2024 09:56 am
-
माण तहसील कार्यालयातील तक्रारी अर्ज व्हायरल!
- Thu 11th Jul 2024 09:56 am
-
पुसेसावळी सह खटाव तालुक्यात चाललंय काय? रेशन फुकट अन् केवायसी ला मोजावे लागतात पैसे?
- Thu 11th Jul 2024 09:56 am
-
औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायीकांचा सुवर्णकाळ सुरू?
- Thu 11th Jul 2024 09:56 am
-
आधी बदलीचे आदेश, नंतर साताऱ्यात पोलिस अधीक्षक यांच्या बदली आदेशाला स्थगिती
- Thu 11th Jul 2024 09:56 am