साताऱ्यात बीफ विक्री करणाऱ्या हॉटेलसमोर स्थानिक महिला आक्रमक

सातारा : साताऱ्यात सदर बझार येथील बिस्मिल्लाह आणि मदिना या दोन हॉटेलमध्ये बीफ विक्री केली जात असल्याने मागील महिन्यात सातारा नगर पालिकेने कारवाई करत ही दोन्ही हॉटेल सील केली होती. सातारा नगरपालिकेने अटीशर्तीचे नियम घालून ही हॉटेल संबंधितांकडून लेखी लिहून घेत पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.. मात्र या हॉटेलमध्ये सातारा शहर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात बीफ खवय्ये येत असून रात्रीच्या वेळी मद्यपान करून या ठिकाणी गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. या ठिकाणी येणाऱ्या मद्यपिंकडून आरडाओरडा करत स्थानिक नागरिकांच्या घराच्या परिसरात लघुशंका केली जात असल्याने महिलावर्गामधून संतप्त व्यक्त केला जात आहे.. ही बाब लज्जास्पद असून महिलांनी संबंधित हॉटेल मालकाची कान उघडणी करत हॉटेल समोरच गोंधळ घातला.. यावेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.. पालिका प्रशासनाने आणि पोलिसांनी हे हॉटेल तात्काळ बंद करून टाकावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय..
 या परिसरात अजूनही छुप्या पद्धतीने जनावरांची कत्तल केली जात असून जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी सदर बझारच्या बेकायदेशीर कत्तलखान्याकडे लक्ष घालावे अन्यथा मोठा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला