लहानग्या बाळाला घेऊन एका माथेफिरुशी लढलेल्या त्या हिरकणीचे खा.उदयनराजे यांनी केले अभिनंदन

श्री.छ.खा.उदयनराजे यानी सौ.जयश्री गोरे यांचे केले अभिनंदन

सातारा न्यूज : सातारा /पुसेगाव येथे रात्रीची वेळ असताना पती पाणी आणण्यासाठी गाडीतून बाहेर पडताच माथेफिरूने गाडीमध्ये प्रवेश करून काही अंतर गाडी पळवण्याचा प्रयत्न केला अॅड सौ जयश्री गोरे व लहानग्या बाळासह कारचे अपहरण करण्याचा थरारक प्रसंग अंगावर काटा आणणारा होता. या घटनेत जयश्री गोरे या हिरकणीसारख्या बेडरपणे लढल्या.

तान्हे बाळ सोबत असलेल्या या महिलेने एका हाताने बाळाला सांभाळत दुसऱ्या हाताने कारचा हॅन्ड ब्रेक ओढला तर पायाने त्यांनी संशयिताला लाथा मारण्यास व प्रतिकार करण्यास सुरुवात केली. चालत्या कारमध्ये महिला बचावासाठी संशयित युवकासोबत झटापट करत होत्या. मात्र संशयिताने ओरडू नका नाहीतर जीव घेईन, असे म्हणत महिलेचा गळा धरुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही जयश्री गोरे डगमगल्या नाहीत. धाडसाने त्यांनी प्रतिकार केला. काही वेळ झुंज झाल्यानंतर आरोपी ने गाडीतून पळ काढला व या सर्वांची सुखरूप सुटका झाली.

सौ गोरे यांना भेटून त्यांच्या जिद्दीचे व हिमतीचे कौतुक श्री. खा.उदयनराजे भोसले केले. या प्रकारच्या प्रसंगांना महिलांना वेळोवेळी सामोरे जावे लागते परंतु जिद्दीने व हिमतीने लढा देऊन आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. सौ गोरे यांचे कौतूक करावे तेवढे कमीच.असे गौरवोद्गार श्री.छ.खा.उदयनराजे यानी केले

या प्रसंगी नगरसेवक अॅड श्री दत्ता बनकर, चार्टर्ड अकाउंटंट श्री श्याम गीते, श्री सचिन साळुंखे, अॅड श्री विनीत पाटील व सौ गोरे यांचे कुटुंबीय व त्यांचे पती अॅड महेश गोरे उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त