लल्लन जाधवच्या टोळीला तडीपारीचा दणका दोन वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार

सातारा  : सातारा शहर परिसरात सातत्याने गुन्हेगारी कृत्यांद्वारे दहशतीचे वातावरण निर्माण करणारे अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव यांच्यासह सहा जणांच्या टोळीला सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हे आदेश दिले आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये खंडणीची मागणी, गंभीर दुखापत करणे,जबरी चोरी, सरकारी कामात अडथळा असे अनेक गुन्हे या टोळीवर दाखल करण्यात आले होते. टोळी प्रमुख आणि टोळी सदस्य यांच्यावर एकूण 11 गुन्हे दाखल असल्याने सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी या टोळी विरुद्ध तडीपारचा प्रस्ताव दाखल केला होता

अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव (वय28 रा. प्रतापसिंहनगर खेड), विलास उर्फ कुल्या शरणप्पा कुरमणी (वय 22, रा. आंबेडकर भवन वनवासवाडी), सर्जेराव उर्फ छोट्या पांडुरंग कांबळे (वय 20, प्रतापसिंहनगर खेड), अजय नंदकुमार खवळे (वय 22, रा. प्रतापसिंह नगर खेड), रोहित दादासाहेब वाघमारे (वय 19 रा. प्रतापसिंहनगर  खेड), ऋषिकेश उर्फ डोंगुल्या नाना कांबळे (रा. प्रतापसिंहनगर खेड),  धनंजय ज्ञानदेव बडेकर (वय 34 रा. प्रतापसिंहनगर खेड) या सहा जणांना पोलीस अधिनियम कलम 55 नुसार दोन वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत. 

प्रस्तावाची चौकशी साताऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी करून त्याचा अहवाल पोलिस अधीक्षक समीर शेख यांना सादर केला. टोळी मधील इसमांना वारंवार अटक व कायदेशीर कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात काही फरक पडलेला नाही. प्रतिबंधात्मक कारवाईचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही त्यांच्या कृत्यांमध्ये कोणती सुधारणा झाली नाही त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी सामान्य जनतेतून मागणी होत होती.

या टोळीला सातारा शहरात सह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. नोव्हेंबर 2022 पासून 13 उपद्रवी टोळ्यांमधील 42 इसमांना आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. यापुढेही सराईत गुन्हेगारांच्या विरोधात हद्दपारी मोका एम पी डी ए अशा  कारवाया करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिला आहे. या प्रस्तावाच्या सुनावणी प्रक्रियेमध्ये अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी सहकार्य केले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात

वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला