शाळा संविधान साक्षर व्हायला हव्यात- सुशिल गायकवाड.

फलटण : इथल्या प्रत्येक भारतीयाला भारतीय संविधानाची ओळख व्हायला हवी.आपले हक्क आणि अधिकार काय आहेत याची जाणीव करून घेण्याची गरज आहे.संविधानाची साक्षरता शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुजली तर संविधानाची ओळख होणार आहे.विद्यार्थी हा महत्वपूर्ण घटक असून संविधाना बाबतचे अधिकचे ज्ञान हे विद्यार्थ्यांमध्ये यायला हवे.भारतीय संविधानाची जागृती विद्यार्थ्यांमध्ये व्हावी.यासाठी गुरूजन वर्गानी सुद्धा विशेष प्रयत्न करायला हवेत.खरं तर शाळा संविधान साक्षर व्हायला हव्यात.
ज्यापध्दतीने शाळेत ग्रंथालय आणि विज्ञानाची एक वेगळी खोली असते तशीच खोली संविधानासाठी असायला हवी.तिथे विद्यार्थ्यांमध्ये संविधान साक्षरता घडवून आणणारे महत्त्वपूर्ण कार्य घडायला हवे.
असे प्रतिपादन ब्ल्यू डायमंड स्कूलचे संविधान उपक्रमशील शिक्षक व कवी सुशिल गायकवाड यांनी व्यक्त केले.ते गोवेकरवस्ती (कोरेगाव) ता.फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.१२ डिसेंबर रोजी हॉटेल चवदारच्या वर्षपूर्तीच्या अनुषंगाने सुशिल गायकवाड यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेने प्रकाशित केलेल्या भारतीय संविधानाच्या ५० प्रास्ताविका प्रतीचे वाटप शिक्षकांसह विद्यार्थ्यांसुद्धा केले.यावेळी पत्रकार विजय शेळके,शाळेचे शिक्षक मनोज चव्हाण आणि दत्तात्रय मसुगडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन ही करण्यात आले.
    मनोगतात सुशिल गायकवाड यांनी पुढे असे म्हटले की,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाची राज्य घटना लिहिण्यासाठी अपार अशी मेहनत घेतली.जगातील सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून आपल्या देशाची राज्य घटना लिहिण्यासाठी बाबासाहेबांना २ वर्ष ११ महिने १८ दिवसाचा जो काळ लागला.हा काळ भारत देशातील प्रत्येक नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा होता.
ब्रिटिशांपासून आपल्याला १९४७ ला स्वातंत्र्य तर मिळालेच होते परंतु देशातील अंतर्गत स्वातंत्र्याची जी लढाई सुरू होते.त्या लढाईला न्याय देण्याची भूमिका फक्त आणि फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून पूर्ण केली.विद्यार्थ्यांना अगदी सहज आणि सोप्या भाषेतून संविधानातील कलमांचा परिचय करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत असेही सुशिल गायकवाड यांनी म्हटलेले आहे.यावेळी शाळेचे शिक्षक मनोज चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना भारतीय संविधाना बद्दल तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती सांगितली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे खूप विद्ववान होते.त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आपला देश लोकशाही प्रधान देश बनलेला आहे.आपण त्यांना महामानव म्हणतो.त्यांचं कार्यच खूप मोठे आहे.आपण आपल्या जीवनात त्यांचा आदर्श घेऊन पुढे गेले पाहिजे.असेही मनोज चव्हाण यांनी म्हटले.भारतीय संविधान प्रास्ताविक प्रत विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.सर्व विद्यार्थ्यांनी अगदी आनंदाने ह्या उपक्रमात सहभागी होत अधुमधून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा अगदी सहजतेने दिली.सुशिल गायकवाड यांनी सादर केलेले 'भारत का संविधान' हे गीत अगदी मन लावून ऐकले शिवाय विद्यार्थ्यांनी सुद्धा सुरात सूर मिसळला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शाळेचे शिक्षक मनोज चव्हाण यांनी मांडले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला