मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या आदेशाला पांचगणी मुख्याअधिकारी निखील जाधव यांच्याकडुन वाटाण्याच्या अक्षता

पांचगणी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी राज्याची सुत्रे हातात घेतल्यापासुन गतिमान व पारदर्शक कारभाराची हमी देत सर्व विभागाच्या प्रशासकीय कार्यालयाची अधिकृत संकेतस्थळ सुरु करा असा आदेश दिला . मात्र पांचगणी गिरीस्थान नगरपालीकेचे मुख्याअधिकारी यांनी देवेद्र फडणवीस यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत . पांचगणी नगरपालीकेची अधिकृत संकेत स्थळ गत तीन वर्षापासुन बंद असल्याच पत्र मुख्याअधिकारी निखील जाधव यांनी कळवल आहे . नगरपालीकेच अधिकृत संकेत स्थळ बंद असल्यामुळे नगरपालीकेच्या ठराव प्रोसेडींग सर्वसामान्याना पाहयला मिळत नाही . 


पाचगणी नगरपालीकेचा कारभार अंधारात असुन जनकेच्या हिताचा होत नसल्याचे संकेत स्थळ बंद राहील्यामुळे लपुन राहीले नाही . काही सुजान नागरीकांनी ठरावाची माहीती माहीतीच्या अधिकारात मागीतली असता . मुख्याअधिकारी निखील जाधव यांनी भरमसाठ शुल्क आकारणी करत सर्वसामान्याना पालीकेचा कारभार कळुच नये याकरीता भिष्म प्रतिज्ञा केली असल्याची चर्चा पांचगणी शहरात रंगु लागल्या आहेत . 

Default Image Caption

 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात सर्वसामान्याना लवकरात लवकर जलद कांमाचा निपटारा व कारभारात पारदर्शकता यावी याकरीता आदेश दिले असतील . मात्र पांचगणी नगरपालीकेचे मुख्याअधिकारी याआदेशाबाबत गंभीरत न घेता महमंद तुघलगी कारभार करत असतील तर मुख्याअधिकारी निखील जाधव यांच्यावर कारवाई होणार का ? याबाबत चर्चा रंगु लागल्या आहेत . पांचगणी गिरीस्थान नगरपालीकेचा कारभारात बरच काही गौडबंगाल आहे . मात्र राज्यातील एक मोठ्या आसामीच्या वरदहस्ताने पाचगणीची खु्र्ची मिळाल्याने मुख्याअधिकारी पांचगणी यांच्यावर कारवाई होणार का ? याबाबत चर्चा आता रंगु लागल्या आहेत .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त