राज्‍यपालांच्‍या आदेशाविराेधात सुनील प्रभू यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

तर या याचिकेवर संध्याकाळी 5 वाजता होणार कोर्टात सुनाव

सातारा न्यूज मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश देताच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

१६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असताना राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत, ते अवैध आहेत. तसेच या बहुमत चाचणीसाठी केवळ एक दिवसाचा वेळ दिला आहे. हा वेळ अपुरा आहे. सर्व आमदारांना पोचण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात, असे प्रभू यांनी याचिकेत म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी झालेल्या सुनामी वेळी सर्वोच्च न्यायालयाने १२ तारखेपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. या काळात काही निर्णय झाला तर आम्हाला न्यायालयात येण्यास सांगितले आहे. त्यामुळे या याचिकेवर तत्काळ सुनावणी येऊन राज्यपालांच्या आदेश रद्द करावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला