साताऱ्यात रविवारी भारतीय संविधानाविषयी अधिवेशन अभिनेते किरण माने यांच्या हस्ते उद्घाटन
Satara News Team
- Fri 27th Sep 2024 01:57 pm
- बातमी शेयर करा
सातारा : ‘भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन अभियान’ अर्थात ‘बी एस फोर राष्ट्रव्यापी अभियानांतर्गत’ अजिंक्य पतसंस्थेच्या विध्याभवन येथे रविवारी जिल्हा क्लस्टर अधिवेशनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांचे हस्ते होणार असून प्राथमिक व माध्यमिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी शबनम मुजावर , प्रभावती कोळेकर, जिल्हाअधिक्षक कृषिअधिकारी भाग्यश्री प्रमोद फरांदे , उपशिक्षणाधीकारी रवींद्र खंदारे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
गेली सहा वर्षे देशात बी एस फोर अभियान सुरू असून यावर्षी देशातील शेकडो जिल्ह्यात क्लस्टर अधिवेशने सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून ही अधिवेशन होत असून यावेळी अंनिस, संभाजी ब्रिगेड, ओबीसी संघटना, शिक्षक संघ, समिति , प्राचार्य संघटना, बौद्ध महासभा, बीएसएनएल, कास्ट्राईब, ईबटा,इत्यादि सुमारे पंचवीस संविधानवादी सामाजिक संघटना सहभागी होत असून पूर्णतः सामाजिक कार्यक्रम आहे.
अधिवेशनामध्ये किरण माने , शबनम मुजावर, प्रभावती कोळेकर, भागयश्रि फरांदे , रविंद्र खंदारे , प्रा डॉ श्यामसुंदर मिरजकर,भरत लोकरे, संतोष शिंदे, प्राचार्य राजेंद्र भिंगारदेवे, प्रकाश खटावकर , एम बी भोकरे, संजय करपे, इत्यादि विचार मांडणार असून संविधानाचे अभ्यासक डॉ विनोद पवार ही पहिल्या सत्राची व एम डी चंदनशिवे ही दुसऱ्या सत्राची अध्यक्षता करणार आहेत.
ध्वजारोहणाने सुरू होणाऱ्या व दिवसभर चालणाऱ्या अधिवेशनात भारतीय संविधान जागृती, अंमलबजावणी,सुरक्षा, संवर्धन,सामाजिक अभिसरण इत्यादि विषयावर चर्चा ,संवाद होणार आहे. या अधिवेशनास जिल्ह्यातील सर्वानी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्लस्टर समन्वयक सुशांत गायकवाड, हणमंत सकलावे यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 27th Sep 2024 01:57 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 27th Sep 2024 01:57 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 27th Sep 2024 01:57 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 27th Sep 2024 01:57 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Fri 27th Sep 2024 01:57 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Fri 27th Sep 2024 01:57 pm
संबंधित बातम्या
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Fri 27th Sep 2024 01:57 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 27th Sep 2024 01:57 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Fri 27th Sep 2024 01:57 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 27th Sep 2024 01:57 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Fri 27th Sep 2024 01:57 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Fri 27th Sep 2024 01:57 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Fri 27th Sep 2024 01:57 pm











