प्रधानमंत्र्यांनी नवीन बांधलेल्या संसदेवर ठेवलेल्या राष्ट्रीय शिल्पाचा वंचित बहुजन आघाडी कडून जाहीर निषेध
Satara News Team
- Sat 16th Jul 2022 11:13 am
- बातमी शेयर करा
नुकतेच प्रधानमंत्र्यांनी नवीन बांधलेल्या संसदेवर ठेवण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय शिल्पाचे उद्घाटन केले. मात्र या नवीन शिल्पातील शांतभाव वगळून, चारही सिंहाचे भाव अतिशय हिंस्र दाखवले आहेत ज्यामुळे मूळ शिल्पाचा आणि त्यात असलेल्या बोधाचा अपमान झाला आहे. सिंहाच्या मूळ शिल्पात बदल करुन नव्या शिल्पातील हिंस्त्रपणा हा संघाचा विश्वास असलेल्या हिंसावादी व विद्वेषी राष्ट्रवादाच्या मूल्यांचे प्रतिक आहे. राष्ट्र चिन्हात बदल घडवून आणण्याचे हे गंभीर षडयंत्र आहे
26 जानेवारी 1950 साली भारत सरकारने सम्राट अशोक यांनी सारनाथ येथे उभारलेल्या स्तंभावरील "सिंह शीर्ष" हे स्वंतत्र भारताची "राष्ट्रीय मुद्रा" म्हणून स्वीकारले. मुळात हे शिल्प आणि त्याच्या खाली असलेले हत्ती, बैल, दौडणारा घोडा आणि सिंह यांची कोरीव शिल्प हे भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग अधोरेखित करते. मानवतावादी, संपूर्ण प्राणीमात्रां विषयी करुणा व मंगल कामना असलेला बुद्ध विचार म्हणजेच धम्म याचे प्रतीक हा सिंह आहे. तो शांत आहे. स्वतंत्र आहे. त्याच्या चेहन्यावर गंभीर भाव आहेत व डोळ्यात दृढ निश्चय आहे. त्याचा जबडा नैसर्गिक रीत्या उघडलेला आहे. शिल्पकाराने अतिशय तन्मयतेने, संपूर्ण बुद्ध विचारांचे भाव या संपूर्ण शिल्पात कोरलेले पाहायला मिळतात. हे मानवतावादी विचार चारही दिशांना पसरावे म्हणून हे चार सिंह पाठीला पाठ लावून चार दिशांकडे तोंड करून आहेत. सम्राट अशोक यांना हे अभिप्रेत होते म्हणून त्यांनी हा स्तंभ व हे शिल्प उभारले आहे .हेच मानवतावादी, सर्वाप्रती स्वातंत्र्य, समता आणि बंधूभावाचा विचार स्वतंत्र झालेल्या भारताला सर्व जगात घोषित करायचे होते. म्हणूनच भारताच्या प्रथम मंत्रिमंडळाने एकमताने हे शिल्प, "राष्ट्रीय मुद्रा" म्हणून स्वीकार केले. नुकतेच प्रधानमंत्र्यांनी नवीन बांधलेल्या संसदेवर ठेवण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय शिल्पाचे उद्घाटन केले. मात्र या नवीन शिल्पातील शांतभाव वगळून, चारही सिंहाचे भाव अतिशय हिंस्र दाखवले आहेत ज्यामुळे मूळ शिल्पाचा आणि त्यात असलेल्या बोधाचा अपमान झाला आहे. सिंहाच्या मूळ शिल्पात बदल करुन नव्या शिल्पातील हिंस्त्रपणा हा संघाचा विश्वास असलेल्या हिंसावादी व विद्वेषी राष्ट्रवादाच्या मूल्यांचे प्रतिक आहे. राष्ट्र चिन्हात बदल घडवून आणण्याचे हे गंभीर षडयंत्र आहे. असे शिल्प मान्य करण्याचा निर्णय हा भारताच्या निर्मात्यांनी व सार्वभौम प्रजासत्ताक भारताने स्वीकारलेल्या स्वतंत्र्य, समता, न्याय व बंधुत्वाच्या मूल्यांचा अपमान होत आहे. या नवीन हिंस्र शिल्पाचा (राष्ट्रीय मुद्रेचा नव्हे) आणि ह्या शिल्पाची संकल्पना बदलण्याचा निर्णय घेणाऱ्या सरकारचा वंचित बहुजन आघाडी यांनी जाहीर निषेध केला आहे .
#bjp
#bjpsatara
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 16th Jul 2022 11:13 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 16th Jul 2022 11:13 am
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sat 16th Jul 2022 11:13 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 16th Jul 2022 11:13 am
संबंधित बातम्या
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sat 16th Jul 2022 11:13 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sat 16th Jul 2022 11:13 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sat 16th Jul 2022 11:13 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sat 16th Jul 2022 11:13 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 16th Jul 2022 11:13 am
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 16th Jul 2022 11:13 am
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Sat 16th Jul 2022 11:13 am
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Sat 16th Jul 2022 11:13 am













