रामराजे म्हणजे मांडूळाची औलाद ....आ. जयकुमार गोरे

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर आ. जयकुमार गोरे घनाघाती टीका.

वाठार स्टेशन :  सध्या सातारा जिल्ह्यात मुंबई - बेंगलोर औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर पेटताना दिसून येत आहे माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच माण खटावचे आमदार जयकुमार गोरे हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
काल आयोजित केलेल्या एमआयडीसी विरोधी संघर्ष समितीच्या कार्यक्रमादरम्यान माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा चांगलाच बोचऱ्या शब्दात समाचार घेतला खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आपल्या भाषणात म्हणाले की, रामराजेंनी एजंट घालून येथे जागा खरेदी करण्याचे काम सुरू केले आहे त्याचप्रमाणे एजंट घातल्यामुळे रामराजेंचे दौरे इकडे सध्या वाढू लागले आहेत मात्र फलटण तालुक्यात एवढे फिरत नाहीत एवढे इकडे फिरायला लागलेत तसेच
१२०० एकर जमीन घेण्याकरीता रामराजेंनी १२०० कुटुंबाचं वाटोळ करण्याचा प्लॅन आखला आहे. अन जशी गुरं मोकळ्या रानात हुदाडत्यात तशी यांना मोकळी वाट झाली आहे हुदडायला
खासदार पुढे म्हणाले रामराजेंना ज्या उत्तर कोरेगाव तालुक्याने निवडून दिले आहे त्याच उत्तर कोरेगाव तालुक्याने मलाही लोकनियुक्त खासदार केले आहे त्यामुळे माझ्याकडे येतील तेव्हा मी लोकांसाठी उभा राहीन व उभा राहिल्यानंतर यांना माघार घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही अशा परखड शब्दात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोळशी येथील कार्यक्रमात थेट रामराजेंवर बोचऱ्या शब्दात टीका केली.


त्याचप्रमाणे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाषण सुरू होतात आपल्या भाषणाचे टार्गेट रामराजे असल्याचे दर्शवत टीकेला सुरुवात केली ते म्हणाले म्हसवड मध्ये ही अशीच एक संघर्ष समिती स्थापन केली आणि तिथे काय सांगतो की MIDC गेली नाही पाहिजे आणि इथे येऊन सांगतो म्हसवडची MIDC मी इथे आणतो तुम्हाला विकास हवाय का म्हणजे ही मांडूळाची अवलाद आहे
सकाळी इथे येऊन सांगतो या भागाचा विकास झाला पाहिजे आणि तिकडे सांगतो MIDC चालली आहे आंदोलन करा आणि वाद वाढवायचे भांडणे लावायची आणि साम्राज्य वाढवायचे गावागावात भांडे लावायची भावा भावात भांडणे लावायची जाती जातीत भांडणे लावायची आणि भांडणे लावून स्वतःची पोळी भाजायची आजपर्यंत त्याचे काम त्याच्या पलीकडे काय नाही गेली वीस वर्षे झाली या भागातली लोक पाणी मागत आहेत व आपण वीस वर्षे या खात्याचे मंत्री होता यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवलं नाही आणि एमआयडीसी केल्यानंतर काय विकास होणार असल्या तिखट शब्दात आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर निशाणा साधला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उत्तर कोरेगाव तालुक्यामधील जनसमुदाय जमला होता
आता मात्र MIDC प्रश्न चांगल्या प्रकारे पेटताना दिसून येत आहे या टीकेनंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक यांची भूमिका काय असेल हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त