औंध संस्थानच्या अधिपती व सातारा जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा आज (मंगळवारी) वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्याकार्याचा घेतलेला आढावा...

औंध : औंध संस्थानला लाभलेल्या राजघराण्यातील थोर कर्तृत्वान पुरुषांमुळे देशात या संस्थानास आदर्श संस्थान म्हणून ओळखले जाते. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचे पती (कै.) श्रीमंत बाळराजे पतप्रतिनिधी यांनीही तोच वारसा चालवला. परंतु, (कै.) बाळराजे यांच्याअचानक निधनामुळे औंधसंस्थानची जबाबदारी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्यावर पडली. त्यानंतर मोठ्याधैर्याने व सामर्थ्याने परिस्थितीशी लढत औंध संस्थानच्या विकासासाठी त्या नेहमी कार्यरत राहिल्या.
औंध संस्थानकडून जनतेच्या अपेक्षापूर्णत्वाकडे नेताना औंधसह संपूर्ण पंचक्रोशीत विकास पर्व उभे केले आहे. २००४ मध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर त्यांनी औंध शिक्षण मंडळाच्या सर्व इमारतींचे नूतनीकरण, मूळपीठ देवीच्या शिखराचा जीर्णोध्दार, श्री भवानी वस्तू संग्रहालयाचे विस्तारीकरण, औंधच्या अंतर्गत रस्ते, नुकतेच मागील वर्षी औंधच्या ऐतिहासिक तळ्याच्या नूतनीकरणासाठी मंजूर केलेला निधी आदी अनेक विकासकामे करून औंध गावाचा कायापालट केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे त्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले लवकरच औंध सह 16 गावांचा पाणी प्रश्न गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या माध्यमातूनच मार्गी लागणार आहे. औंध भागाबरोबर खटाव- माण तालुक्यातील विकासकामे खेचून आणण्यासाठी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचे सदैव प्रयत्नसुरू आहेत.
सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या अग्रेसर असतात. मागील वर्षात त्यांनी औंध जिल्हा परिषद गटातील विकासकामांसाठी कित्येक कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. औंध सारख्या ग्रामीण भागात औंध जिमखाना, बॅडमिंटन हॉल, क्रीडा सुविधा उभ्या केल्या. शहराबरोबर औंध भागातील विद्यार्थी त्यासर्वसुख-सुविधांचा लाभ घेत आहे. श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अमूल्य कामगिरी केली आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त लाख शुभेच्छा...
 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त