कोरेगावमध्ये महावितरणचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

सातारा : कोरेगाव येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता (वर्ग-२) मदन कडाळे रा.तामजाईनगर सातारा यांना लाचलुचपत विभागाने नव्या दोन कामांच्या मंजूरीसाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी लाच घेतल्याप्रकरणी कोरेगाव येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता (वर्ग २) मदन कडाळे वय ४६ वर्षे सध्या राहणार यादव कॉलनी तामजाईनगर सातारा, मूळ राहणार मु.पो.कुरंदवाड ता.शिरोळ जि.कोल्हापूर यांच्यावर कारवाई केली आली.

तक्रारदार हे इलेक्ट्रिक रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर असून त्यांची जे.के. इलेक्ट्रिकल नावाची फर्म आहे. त्यामार्फत ते इलेक्ट्रिक पोल व विद्युत कनेक्शन बसून देण्याचे कामे घेत असतात. त्याप्रमाणे त्यांनी घेतलेल्या तीन कामांपैकी सुरुवातीच्या कामाचे व नव्याने जमा केलेल्या दोन कामांची मंजूरी देण्याकरिता तक्रारदार यांना अकरा हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने अटक केली.

ही कारवाई राजेश वाघमारे लाचलुचपत विभाग उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विक्रम पवार, सचिन राऊत, सहा. फौ. शंकर सावंत, पो.हवा.नितीन गोगावले, निलेश राजपुरे, पो.कॉ.विक्रम कणसे, तुषार भोसले, निलेश येवले, मारुती अडागळे यांनी सदरच्या कारवाईत सहभाग घेतला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त