पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी राजेंद्र कऱ्हाडकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार २०२२ जाहीर
लहू चव्हाण- Tue 6th Dec 2022 02:03 pm
- बातमी शेयर करा
पाचगणी : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी राजेंद्र कऱ्हाडकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार २०२२ जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते उद्या ७ डिसेंबर रोजी पुणे येथे होणार आहे.
हा पुरस्कार सोहळा उद्या सायंकाळी चार वाजता पिंपरी चिंचवड,पुणे येथील अचार्य अत्रे रंगमंचावर राष्ट्रीय सेविका समिती प्रमुख संचालिका शांताआक्का कुमारी, मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक कॅबिनेट मंत्री उषा सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे संपन्न झाला.
अहिल्यादेवी होळकर यांनी मध्यप्रदेशातील मावळ प्रांतासह संपूर्ण देशात अतुलनीय कार्य केले त्याचबरोबर १२ ज्योतिर्लिंगांचा जिर्णोद्धार केला.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारधारेवर धर्मपीठ काम करत असल्याची माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मपीठाचे अध्यक्ष सागर धापटे-पाटील यांनी दिली.
या वर्षी २०२२ साठी फक्त महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार असून समाजात विविध क्षेत्रात यशस्वी कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो. सौ.लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी गेली २२ वर्षे पालिकेच्या नगराध्यक्षा व नगरसेवक म्हणून काम केले आहे.तसेच स्वच्छतेत पाचगणी शहराला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन धर्मपीठाने त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२२ जाहीर केला आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
स्थानिक बातम्या
मसूर पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली?
- Tue 6th Dec 2022 02:03 pm
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Tue 6th Dec 2022 02:03 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Tue 6th Dec 2022 02:03 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Tue 6th Dec 2022 02:03 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 6th Dec 2022 02:03 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 6th Dec 2022 02:03 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 6th Dec 2022 02:03 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 6th Dec 2022 02:03 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 6th Dec 2022 02:03 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 6th Dec 2022 02:03 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 6th Dec 2022 02:03 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 6th Dec 2022 02:03 pm













