तहसील आवारात विनापरवाना लेखनिकांनी नेमून दिलेल्या जागेतच बसावे अन्यथा फौजदारी कारवाई करणार- तहसीलदार डॉ अभिजीत जाधव

फलटण : फलटण तहसील कार्यालयाच्या आवारात नेमून दिलेल्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी विनापरवाना लिखाणाच्या कामासाठी बसणाऱ्या लेखनिकांवर नियमांचे उल्लंघन केल्यास साहित्य जप्त करून फौजदारी कारवाई करण्याचा  इशारा  तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव यांनी दिला आहे फलटण मुद्रांक विक्रेता संघटच्याकडून  तहसीलदारांना विनापरवाना बसणाऱ्या लेखनिकांवर कारवाई करण्याबाबत निवेदन देऊन   दि ९ तारखेपासून मुद्रांक विक्री बंद आंदोलन करण्यात आले  होते यावर कार्यवाही करत तहसीलदारांनी कारवाई दाखल हा आदेश काढला आहे

तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,फलटण तहसिल कार्यालयाच्या आवारात विनापरवाना अनाधिकृतपणे काही व्यक्ती बसत असून, त्यांचेकडून दर पत्रकाप्रमाणे आकारणी केली न जाणे, पक्षकाराकडून जास्त पैसे आकारणी केली जाणे, अशा प्रकारच्या तक्रारी जनतेकडून वारंवार प्राप्त होत  तसेच त्यांचेकडे परवाना नसलेमुळे त्यांचेवर प्रशासनास थेट नियंत्रण ठेवता येत नाहीत, तसेच अधिकार गृहाचे आवारात ते कोणत्याही ठिकाणी बसून कामकाज करत असलेने वाहतूकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे असे अनाधिकृत व्यक्ती बसणेच्या ठिकाणाच्या लगत फलटण ट्रेझरी मध्ये डेमो EVM VVPAT ची स्ट्रॉग रुम असलेने त्याच्या सुरक्षिततेचा मुददा देखील उपस्थित होत असून अधिकारगृह फलटणच्या आवारात विनापरवाना कामकाज करणारे सर्व खाजगी लेखणीकार यांनी अधिकार गृहाच्या उत्तर प्रवेशद्वारालगत पश्चिम  कंपाऊडजवळ बसून कामकाज करावयाचे आहे अन्यथा अशा व्यक्ती यांचेकडील सर्व सामान जप्त करुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १३३ नुसार यांचे विरुध्द कायदेशिर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला