वर्षातून एखदा तरी धम्म पर्यटनास भेट द्यावी.
Satara News Team
- Sun 30th Oct 2022 10:01 am
- बातमी शेयर करा
सातारा : अनेक पर्यटन स्थळांना आपण भेट देत असतोच.तेव्हा आपले दैवत असणारे माता रमाई यांच्या माहेरी वनंद येथे स्मारक व सभागृहातील अमूल्य ठेवा आहे. तेव्हा धम्मबांधवांनी आपल्या परिवारासह किमान वर्षातून एखदा तरी एखाद्या तरी धम्म पर्यटनास भेट द्यावी. असे आवाहन ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते विलासराव कांबळे यांनी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा विनिमय करण्यात आला. तेव्हा कांबळे मार्गदर्शन करीत होते.
प्रारंभी,भाऊ धाइंजे व अशोक भोसले यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा. माणिक आढाव,बी.एल. माने, गौतम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
महाडचे चवदार तळे,रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे या बाबासाहेब यांच्या गावी स्थळांना भेटी देणे गरजेचे आहे.नको त्या ठिकाणी आपण भेट देत असतो. तेव्हा दिक्षाभूमी,चैत्यभूमी आदी देश-विदेशातील धम्म सहलीमध्येही सहभागी झाले पाहिजे.अशा पद्धतीने अन्य विषयावर चर्चाविनीमय झाला. याशिवाय, धम्मबांधव उत्सव कमिटीचे प्रमुख मार्गदर्शक शाहिर माधव भोसले यांनी अखेरपर्यंत धम्म मार्गदर्शन करून आपल्या शाहिरांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले होते.त्यामुळे त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक पोकळी निर्माण झाली आहे. असल्याबाबतही भाऊ धाइंजे, अनिल वीर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सदरच्या चर्चेत हृषीकेश जाधव, अशोक जाधव,तात्याराम जाधव आदि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. दरम्यान, त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेऊन उपस्थित मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sun 30th Oct 2022 10:01 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sun 30th Oct 2022 10:01 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 30th Oct 2022 10:01 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 30th Oct 2022 10:01 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sun 30th Oct 2022 10:01 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 30th Oct 2022 10:01 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 10:01 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 10:01 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 30th Oct 2022 10:01 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 30th Oct 2022 10:01 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 30th Oct 2022 10:01 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 30th Oct 2022 10:01 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 30th Oct 2022 10:01 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 30th Oct 2022 10:01 am













