नढवळ मंडलाधिकारी व तलाठी मारहाणप्रकरणी सूत्रधाराला वडूज पोलिसांकडून अटक

वडूज :  ढवळ, ता. खटाव येथील येरळा नदी पात्रात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर महसूल विभागाने दि. मार्च रोजी कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान, मंडलाधिकारी व तलाठ्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी चौघांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील पसार असलेल्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी सोमवारी अटक केली.
महेश नारायण गोडसे (रा. वडूज, ता. खटाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य संशयिताचे नाव आहे. याबाबत वडूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नढवळ येथील येरळा नदी पात्रात दि. ३० मार्च रोजी दुपारी महेश गोडसे व अन्य काहीजण जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने गौण खनिज उत्खनन करत होते. याची माहिती मिळताच मंडलाधिकारी व तलाठी यांनी तेथे कारवाई केली. या कारवाई दरम्यान, महेश गोडसे, हेमंत गोडसे व अन्य काहींनी मंडलाधिकारी व तलाठी यांच्यावर हल्ला केला. यामध्ये महसूलचे दोन्ही कर्मचारी जखमी झाले होते. 

या घटनेची मंडलाधिकारी शंकर चाटे यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावेळी याप्रकरणातील हेमंत ऊर्फ सोन्या कच्छी, राजेंद्र गोडसे, कांता उमाजी चव्हाण व कुंदन संदिप जगताप यांना अटक केली होती. तर मुख्य संशयित महेश गोडसे पसार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. सोमवारी पोनि घनश्याम सोनवणे यांना महेश गोडसे घरी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने कारवाई करुन संशयित महेश गोडसे याला अटक केली.गोडसे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त