छ. उदयनराजेंच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडणार ?

सातारा : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झालं. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रात भाजपने नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे केंद्रात नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची कोण शपथविधी घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्रातून कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


लोकसभा निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकल्या. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २९३ जागा जिंकल्या. त्यानतंर राष्ट्रीय लोकशाही आघीडीने केंद्रात सत्तास्थापनासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. नव्या सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते खासदार असणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

याचदरम्यान, साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये उदयनराजेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उदयनराजे यांना मंत्रिपद देऊन पश्चिम महाराष्ट्रात भाजप स्वत:चे पाय आणखी मजबूत करण्यासाठी दिल्लीमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात प्रथमच भाजपचा खासदार निवडून आला आहे. त्यामळे उदयनराजेंच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला