खराडेवाडी येथून ट्रान्सफार्मर चोरीला चोरट्यांचे लोणंद पोलिसांना खुले आव्हान?

फलटण : खराडेवाडी ता फलटण येथील ट्रान्सफार्मर चोरीचे सत्र सुरूच असून  नीरा उजवा कालव्यालगतच्या महारके नामक ट्रान्सफार्मरची एकाच वर्षात तब्बल तीन वेळा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे एका वर्षात एकाच ट्रान्सफार्मरची तीन वेळा चोरी करून चोरटे लोणंद पोलिसांना खुले आव्हान तर देत नाहीत ना? अशी चर्चा सध्या नागरिक व शेतकऱ्यांमध्ये यानिमित्ताने सुरू आहे 

आज सकाळी गावातील काही शेतकरी शेतात गेले असता याठिकाणी असणाऱ्या दोन पैकी  एक ट्रान्सफार्मर चोरी झाल्याचे निर्दशनास आले लगेचच त्यांनी या घटनेची माहिती वायरमन यांना दिली  येथे शेजा शेजारी दोन ट्रान्सफार्मर आहेत त्या मधील एक ट्रान्सफार्मर रात्री अंधाराचा व कॅनॉल ला पाणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी डीपी ची चोरी केली आहे असे डीपी चोरीचे प्रकार किती दिवस चालणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे 

  सद्यस्थितीत पाणीटंचाईमुळे शेतकरी आधीच हतबल झाला असताना सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने रानातील उभी पिके जगविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे मात्र अशातच एकाच वर्षात तीन वेळा एकाच ट्रांसफार्मर ची चोरी झाल्याने शेतकरी व नागरिक आश्चर्य व्यक्त करीत असून लोणंद पोलिसांनी जलद गतीने तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला