मा.शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने धन्य झालो ;मा. रामभाऊ जाधव सर
निसार शिकलगार - Mon 31st Oct 2022 08:01 am
- बातमी शेयर करा
भटक्या विमुक्त संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामभाऊ जाधव यांनी बारामती येथे जाऊन माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करून आशीर्वाद घेतले. यावेळी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी भटक्या विमुक्त संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे रामभाऊ जाधव यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
. दीपावलीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंब बारामती गोविंद बाग येथे आपल्या निवासस्थानी आले होते. यावेळी माननीय पवार साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध जिल्ह्यातून मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले होते. भटक्या विमुक्त संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामभाऊ जाधव यांनी माननीय पवार साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले. नुकत्याच झालेल्या भटक्या विमुक्त संघटनेचे नागपूरच्या अधिवेशनानंतर माननीय पवार साहेब यांनी भटक्या विमुक्त संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण रावजी माने यांचे समर्थक असलेले भटक्या विमुक्त संघटनेसाठी आपल्या स्वतःचा जीव ओतून स्व खर्चाने स्व सामर्थ्यावर निस्वार्थपणे भटक्या विमुक्त संघटनेच्या समाजासाठी दोन-तीन जिल्ह्यामध्ये समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी व नागपूर अधिवेशना संदर्भात अहोरात्र मेहनत करून समाज एकत्रित करण्याचे मोलाचे कार्य केले व नागपूरच्या अधिवेशनासाठी भटक्या विमुक्त संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण रावजी माने यांच्या नेतृत्वाखाली नागपूरचे संघटनेचे अधिवेशन यशस्वी रित्या संपन्न केल्याबद्दल संघटनेचे एक प्रमुख कार्यकर्ते या नात्याने रामभाऊ जाधव यांचे पवार साहेब यांनी विशेष कौतुक केले. यानंतर सातारा न्यूजशी बोलताना रामभाऊ जाधव म्हणाले " पवार साहेब सारख्या बड्या नेत्याने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची शुभेच्छा घेऊन मला आशीर्वाद दिले,खरंच पवार साहेबांच्या या आशीर्वादाने मी आज धन्य झालो असे गौरव उदगार रामभाऊ जाधव यांनी बोलताना व्यक्त केले आहे.तसेच नागपूर अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल लक्ष्मणराव मानेसाहेबा सह सर्वच कार्यकर्त्याचे मनोभावे त्यांनी अभिनंदन केले.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 31st Oct 2022 08:01 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 31st Oct 2022 08:01 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Mon 31st Oct 2022 08:01 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 31st Oct 2022 08:01 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 31st Oct 2022 08:01 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 31st Oct 2022 08:01 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 31st Oct 2022 08:01 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 31st Oct 2022 08:01 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 31st Oct 2022 08:01 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 31st Oct 2022 08:01 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 31st Oct 2022 08:01 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 31st Oct 2022 08:01 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 31st Oct 2022 08:01 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 31st Oct 2022 08:01 am













