गावचं मतदान किती यापेक्षा त्या गावाचा विकास मला महत्वाचा - आ शिवेंद्रसिंहराजे

 

            


मेढा : मी त्या गावचं किती मतदान आहे हे कधीच पाहिलं नाही मला त्या गावाचा विकास महत्त्वाचा असून जी जी कामे मला ग्रामस्थ सांगतात किती कामे मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो भामघर येथे या पुलाची खरोखर गरजच होती म्हणून प्राधान्याने मी गवडी आणि भामघर हा पूल केला आता रस्ते रुंदीकरण,पाणीपुरवठा आदी विकास कामे लवकरच पूर्ण केली जातील भामघर,ओखवडी,आसनी,म्हाते पंचक्रोशीतील विकास कामे लवकरच पूर्णत्वास जातील सरपंच विजय सावले यांना पूर्ण सहकार्य करणार असून बोंडारवाडी प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे प्रतिपादन आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केले

            भामघर - गवडी गावांना जोडणाऱ्या वेण्णा नदीवरील पुलाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार शिवेंद्रसिंह राजे बोलत होते यावेळी मेढ्याचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार,रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे,जगन्नाथ वाडकर,सागर धनावडे, गीता लोखंडे,हनुमंत शिंगटे,शांताराम पार्टे,भागोजी पाटील,राजेंद्र खुडे,सरपंच विजय सावले,अर्जुन जाधव,सुरेश बुवा जवळ,ज्ञानेश्वर सावंत,रामभाऊ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते

               आमदार शिवेंद्रसिंह राजे म्हणाले भामघरला मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो होतो तेव्हा नदीच्या पलीकडे गाडी उभी करून नदीतून चालत यावे लागले होते इथल्या लोकांची मोठी अडचण होत होती म्हणून मी पूल करण्याचा निर्णय घेतला आज तो पूल केल्याचं मला समाधान मिळालं आहे.या पंचक्रोशीतील राहिलेली विकास कामे ही लवकरच पूर्ण केली जातील. रामजीबुवा येथील पुलाच्या कामाला सुध्दा लवकर सुरुवात करण्यात येईल जे ठेकेदार वेळेत आणि गुणवत्तेची काम करणार नाहीत त्यांची कामे काढून घेतली जातील. बोंडारवाडी धरणाच्या सर्वेला सुरुवात झाली असून लवकरात लवकर एक टीएमसीच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठीच्या या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करणार आहे.पुनर्वसन कायद्यानुसार बोंडारवाडी प्रकल्प होणार असल्याने आता काहीच अडचण राहिली नाही असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले

 

            सरपंच विजय सावले म्हणाले बाबाराजेंनी शब्द दिला आणि तू पूर्ण झाला नाही असं कधी झालं नाही गवडी आणि भामघर पुलाचा शब्द बाबाराजांनी खरा करून दाखवला असून या पुलामुळे भामघर,आसनी,ओखवडी या पंचक्रोशीचा कायापालट होणार आहे आमच्या गावचे मतदान कमी आहे तरीही बाबाराजेंनी हा पूल रस्ता के टीव्हीवर बंधारे आदी विकास कामे केली आहेत यासाठी आम्हाला जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे व सागर धनावडे,नाना जांभळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भामगर पंचक्रोशीतील रस्त्यांचे रुंदीकरण व्हावे अशी मागणी सरपंच सावली यांनी केली.यावेळी भागोजी पाटील,रामभाऊ शेलार,गीता लोखंडे आदींची भाषणे झाली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला