शेतकऱ्यांच्या आंदोलनाने कोडोली ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे
शेताच्या कडेला कचरा टाकल्यास दोन हजारांचा दंडशुभंम वाघमारे
- Fri 1st Sep 2023 09:39 am
- बातमी शेयर करा

कोडोली : आठ दिवसांपूर्वी सातारा एमआयडीसीकडे जाणाऱ्या देगाव रस्त्यावर शेतकऱ्यांना होत असलेल्या विविध प्रकारच्या कचऱ्याच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात टाकला जाणारा कचरा थेट रस्त्यावर आणून टाकत आपला संताप व्यक्त केला होता. प्रचंड प्रमाणात कचरा रस्त्यावर टाकल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण झाला होता. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेत आता कोडोली ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांच्या शेताच्या कडेला कचरा टाकताना कोणी सापडल्यास दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असा सज्जड इशारा देत अशा प्रकारचा फलकही लावला आहे. या आंदोलनाचे वृत्त प्रसिध्द केल्याने ही कारवाई झालेली असून याबद्दल शेतकऱ्यांनी 'लोकहित' न्यूजलाही धन्यवाद व्यक्त केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, आठ दिवसांपूर्वी एमआयडीसी कडे जाणाऱ्या देगाव रस्त्यावर चंदन गर नजीक मंगळवारी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग लागले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा कचरा रस्त्यावर कसा आला हे कळत नव्हते. मग रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यातून कसरत करत वाहनधारक वाट काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. याबाबतची फेसबुक पोस्ट कर्मवीरनगरमधील जागरुक नागरिक आनंदराव पवार यांनी टाकली होती. त्या पोस्टमध्ये प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर टाकला कचरा असा मजकूर लिहून समस्त जनतेसमोर कचऱ्याची समस्या मांडली होती. याच पोस्टवरुन लोकहित न्यूजने छायाचित्रसह वृत्त प्रसिध्द केले होते ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचवले होते.
शेतकऱ्यांचे आंदोलनाचा दणका व त्याबाबत लोकहित न्यूजने घेतलेली या दोन्ही अखेर कोडोली ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेताच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याबाबत तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. शेतकऱ्याच्या शेतात कचरा पडत असल्यास तो उचलण्याची सोय करण्यात येणार आहेच. मात्र, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीच्या कडेला कचरा टाकला जातो. तिथे रस्त्यावर ग्रामपंचायतीने या ठिकाणी कचर टाकला तर दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, अशी कडक सूचना अधोरेखित केली आहे. कचरा टाकला तर दोन हजार रुपये दंड व फौजदारी कार्यवाही केली जाईल, असे या फलकाचे स्वरुप असून हा फलक कचरा टाकणाऱ्यांचे लक्ष सध्या वेधून घेतो आहे.
फलक लावल्यानंतर एक सापडला त्याची फाटली पावती
फलक लावल्यानंतर देखील याच शेतकऱ्यांच्या शेतीच्या कडेला कचरा टाकताना एक चायनीज सेंटरवाला सापडला. फलक लावून देखील कचरा टाकण्याचा मुर्खपणा करणाऱ्या त्या चायनीज चालकाला दोन हजार रुपये दंड करण्यात आला असून त्याच्याकडून दंड आकारुन तशी पावतीही सन्मानपूर्वक देण्यात आलेली आहे. यामुळे आता कचरा टाकणारांना चांगला प्रतिबंध असेल अशी आशा ग्रामपंचायत प्रशासनासह शेतकरी करत आहेत.
कचरा टाकणाऱ्या नागरिकांनी देखील कमी मुर्खपणा करावा
वास्तविक कोडोली ग्रामपंचायतीकडून कचरा उचलण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, देगाव रस्त्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात कचरा टाकण्याची मुर्खपणाची सवय लागलेल्या नागरिकांना आता तरी जाग यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. घरातील कचरा गोळा करण्यासाठी गाडी येत असेल तर उगाच दुसऱ्या दारात कचरा टाकण्याचा मुर्खपणा सुजाण कचरा टाकणाऱ्या नागरिकांनी करु नये अन्यथा सापडल्यास कचरा टाकणे दोन हजार रुपयांना पडेल व आणखी फौजदारी झाल्यास त्याचा त्रास वेगळा होणारच आहे.
कचरा गाड्यांची संख्या वाढवा
दरम्यान, देगाव रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या शेतात कचरा टाकण्यात येत असल्याने त्यांनी आतापर्यंत प्रचंड त्रास सहन केलेला आहे. त्यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यानंतर मग ग्रामपंचायत प्रशासनाला निदान जाग तरी आली व कारवाईचा फलक लागला आहे. आता नागरिकांनी कचरा टाकू नये ही अपेक्षा व्यक्त होत असताना या परिसरातील काही नागरिकांनी कोडोली ग्रामपंचायतींची कचरा नेणाऱ्या गाड्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले असून कचरा गाड्यांची संख्या वाढली पाहिजे असे या नागरिकांचे मत आहे.
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Fri 1st Sep 2023 09:39 am
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Fri 1st Sep 2023 09:39 am
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Fri 1st Sep 2023 09:39 am
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Fri 1st Sep 2023 09:39 am
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Fri 1st Sep 2023 09:39 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी ता.खटाव येथील हुतात्मा स्मारकाला भ्रष्टाचाराची वाळवी
- Fri 1st Sep 2023 09:39 am
-
शिखर शिंगणापूरमधील आमरण उपोषण अखेर स्थगित!
- Fri 1st Sep 2023 09:39 am
-
वडी ता.खटाव येथील पारायण सोहळा दि.१४ तर मुख्य यात्रेस दि.२१ पासून प्रारंभ
- Fri 1st Sep 2023 09:39 am
-
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Fri 1st Sep 2023 09:39 am
-
शिवडे फाटा अंधारातच! यात्रेपूर्वी लाईट सुरू न झाल्यास शिवसेनेचा इशारा — आंदोलन अटळ!
- Fri 1st Sep 2023 09:39 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्राच्या खाकीची चर्चा अन् कौतुकही.
- Fri 1st Sep 2023 09:39 am
-
गोविंद मिल्कच्या आयकर तपासणीबाबत महत्वाची माहिती समोर
- Fri 1st Sep 2023 09:39 am