करंजे येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
Satara News Team
- Sun 14th Jan 2024 04:13 pm
- बातमी शेयर करा

सातारा : सातारा शहरांमधील नावाजलेली शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, करंजे पेठ, सातारा चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुक्तागिरी मुक्तांगण सोशल फाउंडेशन, साताराच्या संचालिका मा. सौ. अपर्णा अनिल देसाई तसेच सातारा न्यूज चैनल चे संस्थापक व जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे रिपोर्टर मा. श्री. प्रकाश गणपत शिंदे सरही उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खूप महत्वाचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या स्कूल कमिटी चेअर पर्सन मा. सौ.प्रतिभा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
शून्यातून उभी राहणारी तसेच वटवृक्षांमध्ये रूपांतर होणारी शाळा व यासाठी पालकांची व करंजे ग्रामस्थांची होणारी मदत याबद्दल चव्हाण मॅडमनी सर्वांचे आभार मानले.शाळेच्या या चढत्या आलेखात संस्थेचे सचिव मा. श्री. तुषार पाटील सर यांचे काटेकोर नियोजन फार महत्वाचे आहे. त्यांच्या या नियोजन व नवोपक्रम यांमुळेच शाळेचा नावलौकिक सातारा शहरात व शहराबाहेर व देशाबाहेर होत आहे.
इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण फार सुंदररित्या केले.यावेळी भारतीय संस्कृतीला अनुसरून नृत्य व गीते सादर करण्यात आली. या सर्व कार्यक्रमाचे सर्व पालक व संस्थाचालक यांनी भरभरून कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध प्रकारची कलादालने शाळेमध्ये तयार केली जातात की जिथे सर्व विषयांना अनुसरून विद्यार्थी आपली कलाकृती मांडत असतात. यामध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विषयानुसार तिथे आपली कलाकृती सादर केली . या सर्व कलादांनांचे उद्घाटन संस्थेच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमास सर्व पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
यानंतर शाळेमध्ये " फूड फेस्टिवल" भरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या सदस्या मा. सौ .मोहिनी ताई पाटील उपस्थित होत्या. त्यांनी फूड फेस्टिवलचे उदघाटन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध भारतीय पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते,तसेच या फूड फेस्टिवल ला सर्व पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञानाची सुद्धा जोड मिळणार आहे त्यामुळे त्यांना भविष्यामध्ये आपल्या जीवनाची दिशा ठरवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे असे पालकांनी सांगितले.
वरील सर्व उपक्रमास शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. वत्सला डुबल , उपाध्यक्ष मा. श्री.जगन्नाथ किर्दत, उपाध्यक्ष नंदकिशोर जगताप, सचिव मा. श्री. तुषार पाटील,स्कूल कमिटी चेअरपर्सन मा. सौ.प्रतिभा चव्हाण,संचालिका मा.सौ हेमकांची यादव, संचालक मा. श्री. रवींद्र जाधव, संस्था सदस्य मा. श्री. सारंग पाटील सर , मा. श्री.चव्हाण सर व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीचे विद्यार्थी कु. पूर्वा धर्माधिकारी व चि . रेहान बागवान यांनी केले. दहावीचा विद्यार्थी प्रतिनिधी चि.शर्विल जाधव व विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. वैष्णवी जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच आभारही मानले. कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निलम शिंदे, पर्यवेक्षिका कु. दिपाली कदम, पी. आर. ओ. सौ. मंजुषा किरकिरे व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. रसिका निकम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Sun 14th Jan 2024 04:13 pm
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Sun 14th Jan 2024 04:13 pm
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Sun 14th Jan 2024 04:13 pm
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Sun 14th Jan 2024 04:13 pm
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Sun 14th Jan 2024 04:13 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी ता.खटाव येथील हुतात्मा स्मारकाला भ्रष्टाचाराची वाळवी
- Sun 14th Jan 2024 04:13 pm
-
शिखर शिंगणापूरमधील आमरण उपोषण अखेर स्थगित!
- Sun 14th Jan 2024 04:13 pm
-
वडी ता.खटाव येथील पारायण सोहळा दि.१४ तर मुख्य यात्रेस दि.२१ पासून प्रारंभ
- Sun 14th Jan 2024 04:13 pm
-
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Sun 14th Jan 2024 04:13 pm
-
शिवडे फाटा अंधारातच! यात्रेपूर्वी लाईट सुरू न झाल्यास शिवसेनेचा इशारा — आंदोलन अटळ!
- Sun 14th Jan 2024 04:13 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्राच्या खाकीची चर्चा अन् कौतुकही.
- Sun 14th Jan 2024 04:13 pm
-
गोविंद मिल्कच्या आयकर तपासणीबाबत महत्वाची माहिती समोर
- Sun 14th Jan 2024 04:13 pm