कराड येथील विधी महाविद्यालयात न्यायाधीश परिक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन.

कराड : भारती विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, कराड येथे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या प्रारंभी प्लेसमेंट सेल अंतर्गत आज न्यायाधीश परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय न्यायाधीश सुधीर बोमीदवार साहेब, (Jt. CJJD AND JMFC  कराड यांनी उपस्थिती लावली होती. 

 

         न्यायाधीश परीक्षेचे स्वरूप आणि मार्गदर्शन या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधन केले. आपले कायदा जरी बदलत असले तरी सुद्धा कायद्याचा जो मूळ हेतू आहे तो कधीच बदलत नाही.त्याचबरोबर ही परीक्षा जर आपल्याला यशस्वी करायची असेल तर आपल्या सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणे गरजेचे आहे आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायच्या असतील तर Bare Act वर भर दिला पाहिजे तरच या परीक्षेमध्ये आपण चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतो. तसेच आवश्यक कागदपत्र आणि त्याची पूर्तता कशी करावी तसेच मुलाखतीची तयारी कशी करावी यावर मार्गदर्शन केले . येणारे नवीन कायदे आणि जुने कायदे याचा तुलनात्मक अभ्यास मुलांनी करावा. अशा विविध पैलूंवर प्रमुख पाहुण्यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले .
           


          सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सतीश माने यांनी केले तर पाहुण्यांची ओळख डॉक्टर खैरनार सर यांनी करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ.संजीवनी सूर्यवंशी यांनी केले.आभार प्रदर्शनाचे काम प्राध्यापक अरविंद डगळे सरांनी केले. कार्यक्रमास प्रा.दिपीका पाटील , तेजस्विनी साबळे, संजय मदने, विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त