महाबळेश्वर पालिकेतील दोन कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

महाबळेश्वर :  महाबळेश्वर पालिकेतील दोन कर्मचारी हे प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सेवापूर्ति सत्कार सोहळा पालिका सभागृहामध्ये आयोजीत करण्यात आला होता रमेश रोकडे कार्यालय शिपाई व सुरेश बिरामने हे वेण्णालेक बोटमन यांनी ३८ वर्षांहून अधिकची प्रदीर्घ सेवा पूर्ण केली त्यानिमित्त पालिका प्रशासक पाटील यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ व देयकांचा धनादेश देऊन यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना प्रशासक योगेश पाटील यांनी, महाबळेश्वर नगरपालिकेमध्ये ३८ वर्षांहून अधिकची प्रदीर्घ सेवा देऊन प्रगतीसाठी व नावलौकिक वाढविण्यासाठी देलेले योगदान कायम सर्वांच्या मनात राहील.दोन्हीही कर्मचारी यांनी अतिशय विनम्र पणे नागरिकांची,पर्यटकांची उत्तम सेवा केली असल्याचे सांगून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आपले जीवनातील सर्वाधित कार्यकाळ नगरपरिषद सेवेत व्यतीत केला असलेने ते नगरपरिषद कुटुंबातील व्यक्ती झाले हात भविष्यातील सर्व प्रसंगात नगरपरिषद त्यांचे मागे खंबीरपणे उभी राहिली अशी ग्वाही दिली सेवानिृत्तीनंतर सुख समृध्दी ,आरोग्यदायी दिर्घ आयुष्य लाभो अश्या शुभेच्छा दिल्या.
          बोटमन सुरेश बिरमाने यांनी महापूर काळातील आठवणी सांगताना भावनावश झाले दोन्ही कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार केल्यामुळे त्यांनी मुख्याधिकारी यांचे आभार मानले कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतोष दड यांनी केले, 

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त