उपसा सिंचन योजनेच्या स्त्रोतांचे ठिकाणी जलमापक यंत्र बसविण्याचे आवाहन

सातारा  : कोयना सिंचन विभाग कोयनानगर कार्यक्षेत्रातील खासगी उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांनी  तसेच सहकारी पाणी पुरवठा योजनांनी स्वखर्चाने स्त्रोतांच्या जागी बंदिस्त वितरण नलिकेवर जलमापक यंत्र बसविणे अनिवार्य आहे.   त्यानुसार प्राधिकरणाने पाणी वापराचे दर पुढीलप्रमाणे निश्चित केले आहे. 
     वहन व्ययासह नियंत्रित पाणी पुरवठा (धरणाखालील नदी/को. प. बंधारा)  पाणी वापराचे दर (पैसे प्रति 1000 लिटर) खरीप 5.00, रब्बी 10.00, उन्हाळ 15.00 असे एकूण 30.00.
     प्राधिकरणाच्या आदेशापासून एक वर्षाच्या संक्रमण कालावधीपर्यंत (दिनांक 28 मार्च 2023 पर्यंत) खाजगी उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यानी तसेच सहकारी पाणी पुरवठा योजनांनी जलमापक यंत्र न बसविलेस, पाणी वापराचे प्रति हेक्टर दर खालील प्रमाणे क्षेत्राधारीत आकारण्यात येतील.
    सन 2021-22 साठी अन्नधान्य व इतर पिकांसाठी खरीप 39, रब्बी 59, उन्हाळ 117 असे एकूण 215 तर ऊस व केळी खरीप 187, रब्बी 375, उन्हाळ 560 असे एकूण 1122.
सन 2022-23 साठी अन्नधान्य व इतर पिकांसाठी खरीप 600, रब्बी 1200, उन्हाळ 1800 असे एकूण 3600 तर ऊस व केळी खरीप 1890, रब्बी 3780, उन्हाळ 5670 असे एकूण 11340.
 खाजगी उपसा सिंचन येाजनेच्या लाभार्थ्यांनी तसेच सहकारी पाणी पुरवठा योजनांनी  उपरोक्त संक्रमण कालावधीत जलमापक यंत्र न बसविल्यास/ जलमापक यंत्र बंद पडल्यास/जलमापक यंत्रामध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आल्यास उपरोक्त क्षेत्राधारित दराचे दोन पट दराने आकारणी करण्यात येईल. खाजगी उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांनी जलमापक यंत्र न बसविल्यास, मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षापासून त्यांच्या पाणीपट्टी आकारणीमध्ये लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे.
तरी सर्व सबंधितांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांचे योजनेवर त्वरित जलमापक यंत्र बसवावे अन्यथा त्यांचे वाढीव पाणीपट्टी बाबतची कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांनी कळविले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला