वडुज व मसूरला दोन वर्षापूर्वी पडलेल्या सशस्र दरोड्यातील फरार आरोपीला ‘एलसीबी’ पथकाने ठोकल्या बेड्या

सातारा : सातारा जिल्ह्यातील वडुज व मसूरला दोन वर्षापूर्वी पडलेल्या सशस्र दरोड्यातील फरार असलेल्या मोस्ट वॉन्टेड सराईत आरोपीच्या सातारा पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. अतुल लायलन ऊर्फ नायलन भोसले (वय २६, रा. कासारी, ता.आष्टी, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. दुहेरीमोक्क्यामध्य सुमारे दोन वर्षापासून तोपोलिसांना हवा होता.

सातारा जिल्ह्यामध्ये २०२२ मध्ये वडूज व उंब्रज भागांमध्ये दरोडा टाकून वे लोकांना मारहाण केल्याबाबतचे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या तपासामध्ये एलसीबीने बीड जिल्ह्यातील टोळी निष्पन्न करुन यापूर्वीच त्यामध्ये टोळी प्रमुख आरोपी – होमराज ऊर्फ होम्या उध्दव काळे व त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.

या कारवाईनंतर वडूज व उंब्रज येथील दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये संबंधित टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली. मोक्कासारखे दोन गुन्हे दाखल -व असतानाही आरोपी अतुल भोसले हा मात्र पोलिसांना सापडत नव्हता. ल सातारा पोलिस त्याच्या मागावर होते. ध्ये तो वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता.

पोलिस त्याच्या शोधात असतानाच तो आरोपी फलटण जि. सातारा येथे येणार असल्याची माहिती एलसीबी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर पाटील, पृथ्वीराज ताटे, रोहीत फार्णे, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस साबीर मुल्ला, मंगेश माहाडीक, सचिन साळुंखे, सनी आवटे, मुनीर मुल्ला, राजू कांबळे, अमोल माने, मोसीन मोमीन, विजय निकम यांनी कारवाईत सहभाग घेतला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त