सोमवारी उपोषण होणारच शास्तीच्या नोटिसा देवून सीईओंनी अतिक्रमणे केली पूर्ववत : भोगांवकर
Satara News Team
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
- बातमी शेयर करा
सातारा : करंजे नाका ते मोळाचा ओढा दरम्यान रस्त्यावर असलेल्या दुकानांची लोखंडी शेडची अतिक्रमणे तातडीने काढून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदनाद्वारे केली होती. मात्र, बापट यांनी भोगांवकर यांनाच उलटसुलट पत्रव्यवहार करुन त्यांचे सोमवारी होणारे उपोषण हाणून पाडण्याचा डाव केला. मात्र, भोगांवकर यांनी बापटांच्या पत्राला केराची टोपली दाखवून सोमवारी उपोषण होणारच, असे ठणकावले आहे.याबाबत भोगांवकर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, करंजे नाका ते मोळाचा ओढा दरम्यान रस्त्यांवर सातार्यातील व्यापार्यांनी पत्र्याची लोखंडी शेड्स उभारुन मेढा-सातारा मुख्य रस्त्यावरच गेल्या काही वर्षात अतिक्रमणे केलेली आहेत. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. या अडथळ्यांमुळे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर अपघातही झाले आहेत. परंतू गरीबांना वेगळा आणि व्यापार्यांना वेगळा न्याय, याप्रमाणे पालिकेने मोळाचा ओढा येथील व्यापार्यांना नेहमीच सॉफ्ट कॉर्नर देत त्यांनी केलेल्या अतिक्रमणांकडे कानाडोळा केलेला आहे. त्यामुळे भोगांवकर यांनी या अतिक्रमणांविरोधात 15 ऑगस्ट 2022 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. परंतू प्रशासनाने संबंधित दुकानांवर आम्ही तत्काळ कारवाई करतो, आपण करीत असलेले आत्मदहन थांबवा, अशी विनंती केली होती. नऊ दिवस उलटूनही पालिका प्रशासन काहीच कारवाई करीत नसल्याने भोगांवकर यांनी पुन्हा 24 ऑगस्ट रोजी पालिकेचे मुख्याधिकारी बापट यांना स्मरणपत्र देवून संबंधित अतिक्रमण काढण्याची विनंती केली होती. तसेच ते अतिक्रमण न काढल्यास सोमवार दि. 29 ऑगस्ट 2022 पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा तसेच जिवीतास बरे-वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी पालिका मुख्याधिकारीच जबाबदार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी मुख्याधिकार्यांनी भोगांवकर यांनाच उलट पत्र पाठवून संबंधितांवर शास्तीच्या नोटीसी काढून त्यांचे अतिक्रमण पूर्ववत केले असल्याची माहिती भोगावकरांना दिली आहे. तसेच आपण 29 ऑगस्ट रोजी उपोषण करु नये, असा सल्लाही या पत्रात देण्यात आला आहे. वास्तविक ही जागा नागरी विभागामध्ये समाविष्ट होत असल्याने ही सर्व बांधकामे रस्त्याच्या मध्यापासून 20 मीटर अंतरावर अथवा हद्दीपासून 4.5 मीटर अंतरावर (यापैकी जास्त असेल असे अंतर लागू) करण्याबाबतचा नियम आहे. परंतू मुख्याधिकार्यांनी तशी कारवाई न करता भाग निरीक्षक, अतिक्रमण विभागाच्या अधिकारी-कर्मचारी व सीईओंच्या फायद्यासाठी शास्तीच्या नोटीसा देवून कारवाई करण्यामध्ये चालढकल केली जात आहे. मोळाचा ओढा ते करंजे नाका परिसरात झालेली अतिक्रमणे हे पैसा खाण्याचे कुरण दिसून येत आहे. या परिसरात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्यास मुख्याधिकारी जबाबदार की भाग निरीक्षक जबाबदार राहणार? असा सडेतोड सवाल भोगांवकर यांनी केला आहे. त्यामुळेच मुख्याधिकारी बापट, भाग निरीक्षक सतीश साखरे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा व पुणे येथील कार्यालयाकडे तक्रार करुन त्यांनी कमविलेल्या संपत्ती व मिळकतीची चौकशी करण्याची मागणीही केली असल्याची माहिती भोगांवकर यांनी निवेदनात दिली आहे. तसेच सातारा पालिकेच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करणार असल्याचे भोगांवकर यांनी सांगितले आहे.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या सौ.काजलताई नांगरे पाटील मैदानात
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटात धनशक्ती तेजस्वी' होणार की जनशक्तीची सरिता वाहणार?
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
-
फलटण नगरपालिका निवडणुकीतला पराभव राजे गटासाठी की शिवसेना एकनाथ शिंदेचा?
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
-
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
-
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
-
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
-
महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठीभेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
- Sun 28th Aug 2022 12:10 pm
-
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Sun 28th Aug 2022 12:10 pm











