महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी शिफारस केलेल्या शास्त्रीय गुळ निर्मिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत करावे-डॉ. पिसाळ

देशमुखनगर : दि. 20 मे 2024 रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव ता. जि. सातारा आणि प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे घेण्यात येत असलेल्या तीन दिवसीय शास्त्रोक्त पद्धतीने गुळ निर्मिती प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  डॉ. आर के विश्वकर्मा प्रकल्प समन्वयक, अभाकृप, सिफेट, लुधियाना येथून ऑनलाईन पद्धतीने व श्री आशुतोष जाधव, जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड कोल्हापूर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोककुमार पिसाळ, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर हे होते.

 

त्यांनी कृषी विद्यापीठाचे शास्त्रीय गूळ निर्मितीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत करावे असे प्रतिपादन केले  व डॉ. विश्वकर्मा यांनी गुळासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत शेतकऱ्यांना आश्र्वस्त केले. प्रथम दिवसाच्या तांत्रिक सत्रा मध्ये डॉ. सुभाष घुले, उपसर व्यवस्थापक महाराष्ट्र कृषी पणन मंडळ, कोल्हापूर यांनी गुळाची भौगोलिक मानांकन पणन व्यवस्था आणि निर्याती संदर्भात मार्गदर्शन केले यासोबतच गुळ प्रक्रियेतील विविध निवीष्ठांची ओळख आणि वापर याची माहिती डॉ. विद्यासागर गेडाम, कृषी विद्यावेत्ता, प्रा ऊस व गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर तसेच कर्जपुरवठा व प्रकल्प अहवाल संबंधित माहिती श्री गणेश गोडसे, प्रमुख जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक कोल्हापूर यांनी दिली. दुसऱ्या दिवसाच्या तांत्रिक सत्रा मध्ये ऊस पिकाची ओळख वाढीची अवस्था आणि सुधारित वाणांची माहिती डॉ. योगेश बन, ऊसपैदासकार, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांनी दिली. डॉ. कल्याण बाबर, विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव ता. जि. सातारा यांनी शास्त्रीय गुळ निर्मिती संदर्भात माहिती दिली. दुपारच्या सत्रामध्ये गुळ निर्मितीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणे यांची ओळख व निगा, गुळाचे रासायनिक पृत्थकरण, गुळ,  काकवी आणि पावडर निर्मितीचे प्रात्यक्षिक डॉ. यंगे, कनिष्ठ संशोधन अधिकारी, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांनी दाखवले. तिसऱ्या दिवशीच्या तांत्रिक सत्रा मध्ये भारतीय अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार पॅकेजिंग नियमावली बाबत डॉ सिद्धार्थ लोखंडे, सहाय्यक प्राध्यापक, तंत्रज्ञान विभाग, शिवाजी विद्यापीठ,  कोल्हापूर यांनी माहीती दिली. तसेच अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी आणि प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत सखोल मार्गदर्शन डॉ अभिजित गाताडे, सहाय्यक प्राध्यापक, अन्न शास्त्र व तंत्रज्ञान विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी केले.

श्रीमती प्रदीपा पावडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूर यांनी अन्न सुरक्षा मानके कायदा आणि तरतुदी याबाबत चर्चा केली. गुळाच्या पॅकेजिंग चे प्रकार याबाबत श्री वसंत सुतार, सेलसिल पॅकेजिंग, कोल्हापूर यांनी चर्चा केली. अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वच्छता मानके व डिजिटल मार्केटिंग बाबत डॉ कल्याण बाबर विषय विशेषज्ञ अन्न शास्त्र व तंत्रज्ञान कृषि विज्ञान केंद्र बोरगाव यांनी मार्गदर्शन केले. सांगता समारंभासाठी डॉ लोखंडे, डॉ गाताडे, डॉ येंगें उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ. कल्याण बाबर विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव यांनी केले. प्रशिक्षणासाठी प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर येथील अधिकारी व कर्मचारी यांचे सहाय्य लाभले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त