प्रेमात वेडी पो.रागिणी भोसले माझा नाहीस तर कोणाचाच नाही म्हणत केला नव-याचा घात अविचाराने मुले झाली अनाथ,

साताऱ्यातही जीवापाड प्रेम करणारे दोघेही प्रेमाची उपमा देत प्रेमविवाह करतात. पण

सातारा : भातुकलीच्या खेळामधील राजा आणिक राणी...अर्ध्यावरती डाव मोडला...अधुरी एक कहाणी या कवि मंगेश पाडगावकर यांची कविता जुन्या मराठी गीताप्रमाणे अनेकांचे संसार भातुकलीच्या खेळामधील डावाप्रमाणे अर्ध्यावरती मोडताना आज दिसत आहेत. साताऱ्यातही जीवापाड प्रेम करणारे दोघेही प्रेमाची उपमा देत  प्रेमविवाह करतात. पण पती प्रॉपर्टी, सोने, पैसा याला महत्व देणारा असल्यामुळे नव्याचे नऊ दिवस संपताच प्रेमाच्या आणाभाका घेवून एकत्र आलेले दांम्पत्यामध्ये वादविवाद सुरु झाला.  अखेर पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल २२ फेब्रुवारीमध्ये लागणार होता. पण त्यापूर्वीच अविचाराने कायद्याच्या चौकटीतील पोलिस पत्नीने  दहा लाखाची सुपारी देवून त्याचा काटा काढला. या  कृत्याने मात्र दोन मुले अनाथ झाली. अन प्रेमाच्या वेडीला मात्र कायद्याच्या बेडीत अडकावे लागले.

वाढेफाटानजिक २४ जानेवारी २0२३ रोजी अमित भोसले, रा. शुक्रवार पेठ, सातारा यांचा पोलिस पत्नी रागिनी भोसले शाहुपूरी पोलिस ठाण्याअंतर्गत मंगळवार पेठ पोलिस चौकीत कार्यरत असणाऱ्यांनी आपल्या कल्पकतेने सुपारी देवून त्याचा काटा काढला. अन दोन मुले अनाथ झाली. आता या मुलांचे आजोबावर नाथ होण्याची वेळ आली आहे. या घटनेदरम्यान, पोलिस पत्नी रागिणी या धुळे येथे प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. त्यावेळी याचा निरोप समजताच मैत्रीणीसमवेत सातारा येथे येवून याबाबत प्रथमच ही घटना समजली असा अभास करत पतीचा मृतदेह पाहून ओक्साबोक्सी रडू लागली. पण हळूहळू हे चित्र स्पष्ट होवू लागले. या दरम्यान, सातारा तालुका पोलिस ठाण्याने पोलिस पत्नीस केंद्रबिंदू केले होते. पण उकल होण्यासाठी अमित भोसले याचा दहावा होईपर्यंतचा काही अवधी दिला अन त्याप्रमाणे दहाव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पोलिस घरी पोहोचले त्यावेळी तपासअधिकारी आल्यानंतर पोलिस पत्नीने कोणतेही आढेवेढे न घेता स्वत:हूनच घटनाक्रम सांगितला. रात्री अपरात्री येवून मारहाण तर होतच असे. तर कधी विवस्त्र होईपर्यंत मारहाण करत असे, हा प्रकार थक्क करणाराच होता. एकूणच पोलिस खात्यात असून कायद्याच्या सर्व चौकटी माहित असूनही अखेर रागिणी भोसले यांनी उचललेले पाऊल मात्र विनाशाकडे घेवून गेले. याबाबत तपासी अधिकारी विश्वजित घोडके यांनी याबाबत याच गुढ उकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या खुनापाठीमागील एक- एक पैलू उघडले ते ऐकून मात्र ते ही थक्क झाले. 

प्रेमाच्या आणा भाका घेवून प्रेमविवाह झाला. इथपर्यंतचा प्रवास सुखाचा झाला. विवाहानंतर नव्याचे नऊ दिवसही आनंदात गेले. हळूहळू मग पतीने ही प्रेमा तुझा रंग कसा? हे दाखवू लागला. मुळात पती अमित हा बाहेरख्याली होता. त्यामुळे तो रात्री अपरात्री घरी आल्यानंतर पोलिस पत्नीस मारहाण करत असे. अन ती ही दिवसभर निर्भिड पोलिस वावरणारी रात्री मात्र पतीसमोर शेळीच व्हायची. दरम्यान, या संसारवेलीवर दोन फुले उमलली पण तरीही मारझोडचा प्रकार सुरुच होता. पोलिस महिला म्हणून समाजातील अनेकांना अन्याय करणाऱ्यांना सरळ करत होती. पण स्वत:वर होणाऱ्या अन्यायापासून स्वत:ला मात्र परावृत्त करु शकली नाही. अनेकदा त्याला सोडण्याचा विचार करत होती. पण ज्या वयात स्वत:पेक्षाही जीवापाड प्रेम आपल्या पतीवर केले. त्याला भातुकलीच्या खेळाप्रमाणे अर्ध्यावर सोडणे सहजासहजी मन मानतच नव्हते. आता दररोजच्या या त्रासाला कंटाळून तिने यापासून फारकत घेण्यासाठी घटस्फोटाचा पर्याय निवडला. न्यायालयात घटस्फोटासाठी प्रक्रियाही सुरु होती. २२ फेब्रुवारी २0२३ रोजी याचा अंतिम निकालही लागणार होता. पण त्यापुर्वीच सुड घेण्यासाठी अविचाराने घेतलेल्या निर्णयामुळे तिने त्याला जगातून पती अमितला संपवले. या घटनेमुळे दोन मुले मात्र अनाथ झाली. ही घटना ऐकून सातारकरही म्हणून लागले पतीबरोबर संघर्ष करण्यापेक्षा घटस्फोटाचा निवडलेला मार्ग योग्य होता. त्यामुळे कधीकाळी प्रेमाच्या आणाभाका घेत संसार थाटला असला तरी आता व भविष्यातही पटणारच नाही तर उर्वरीत आयुष्य जगण्यासाठी पोलिस महिलेने घटस्फोट घेवून संसार मोडून त्याला वाऱ्यावर सोडून आपल्या क्षेत्रात चांगले करिअर करत दोन्ही मुलांचे संगोपन केले असते. यामध्ये स्वत:चे व मुलांचेही आयुष्याला चांगली कलाटणी देता आली असती पण आता अविचाराने केलेल्या कृत्याने दोन मुले अनाथ झाली. आता अनाथांचा नाथ शोधू कोणाला हा प्रश्न मात्र मुलांसमोर नक्कीच राहिला आहे.

अमितच्या मृत्यूचे कारण ठरले त्याच्या मैत्रिणी

अमित भोसले, शुक्रवार पेठ सातारा येथे राहत होता. त्याने उमद्या वयात मैत्रीणीभोवती पिंगा घालण्यास सुरुवात केली. यामध्ये पत्नी रागिणी ही या जाळ्यामध्ये आली. पण सुरुवातीला याची कोणतीही भनक नसणाऱ्या पत्नीस मात्र, प्रेमविवाहानंतर रंगाचा बेरंग समजला. त्यावेळी तिच्या पायाखालची वाळु सरकली. अमित हा पैसा, सोने, मालमत्ता असणाऱ्या मैत्रीणीशी पिंगा घालत असे. यावरुन पत्नी रागिणी समवेत अनेकदा वाद-विवाद व्हायचे. पण हा वाद सुरुवातीला इतक्या विकोपाला जाईल असे वाटले नव्हते. पण एका बाजूला एका पाठोपाठ अनेक मैत्रीणीशी पिंगा हे मात्र, कायद्याची चौकट माहित असणाऱ्या पोलिस रागिणी यांना सहन होत नसे. अखेर या सर्वातुन मुक्त होण्यासाठी त्याचा सुपारी देवून काटा काढला.

पोलिस पत्नी अडकली कायद्याच्या बेडीत

जिल्ह्यात कोरोनाच्या काळात पती-पत्नीमध्ये झालेले कलह घटस्फोटापर्यंत पोहोचले होते, याच काळात न्यायालयात दीडपट प्रकरणे दाखल होती. आता कोरोना गेला. तरीही मात्र, हा सीलसीला सुरुच आहे. याची प्रचिती साताऱ्यात २४ जानेवारी २0२३ रोजी अमित भोसले याच्यावर झालेल्या गोळीबाराने आली. कायद्याची चौकट माहित असणाऱ्या पोलिस पत्नीने पती हा मैत्रीणीसमवेत  रंगाचा बेरंग करत आहे त्यामुळे त्याच्यापासून घटस्फोट मिळविण्यासाठी हालचाली चालू केल्या होत्या. त्यानुसार २२ फेब्रुवारी २0२३ रोजी याचा अंतिम निकालही लागणार होता. पण अविचाराने निकालापूर्वीच त्याचा काटा काढल्याने आता प्रेमाच्या वेडातील पोलिस पत्नी कायद्याच्या बेडीत अडकली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त