धक्कादायक मुलाने केला आईवर बलात्कार,जावळी तालुक्यात पानस पुनर्वसन येथे घडला प्रकार

जावली : जावली तालुक्यातील पानस पुनर्वसन येथे आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून आनंदा मारुती सणस या व्यसनी मुलाने आपल्या पंचावन्न वर्षाच्या आईवरच बलात्कार केला आहे पोटच्या पोरानेच बलात्कार केल्याची तक्रार करण्याची वेळ या मातेवर आली असून पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.

 

न्यायालयाने त्याला ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जावली तालुक्यातील पानस पुनर्वसन येथील आनंदा मारुती सणस याने आपली आई किचन मध्ये काम करत असताना मागून येऊन मिठी मारली व आईला फरशीवर खाली पाडून तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले आणि कोणाला काही सांगू नको नाहीतर तुला जीव मारून टाकीन अशी धमकी दिली मात्र या आईने मेढा पोलीस ठाण्यात या मुला वरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.

त्याला न्यायालयाने ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या घटनेने तालुक्यात खळबळ निर्माण झाली असून या मुलाचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे अधिक तपास सपोनि अश्विनी पाटील करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला