डॉ.सागर गोरड यांना यशवंतराव माने युवा विद्यार्थी पुरस्कार

Yashwantrao Mane Yuva Vidyarthi Award to Dr. Sagar Gord
श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेत दि १६ जुलै रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी संस्थेचे संचालक बाळासाहेब माने, सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने , मुख्याध्यापक आर आर कट्टे, संभाजी पोळ कीर्तनकार अक्षय महाराज भोसले, माजी विद्यार्थी फाऊंडेशनचे अध्यक्ष रणजित भोसले, उपाध्यक्ष आशिष माने व सर्व सदस्य उपस्थित होते.

ज्या शाळेत शिकलो , घडलो त्याच शाळेत आज झालेला सत्कार भविष्यात उत्तुंग यश मिळविण्यासाठी नक्कीच प्रेरणा देत राहील असा विश्वास डॉ श्री सागर भामाबाई आण्णा गोरड यांनी व्यक्त केला .गोंदवले ता. माण येथील श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थी फाउंडेशनच्या वतीने परमपूज्य यशवंतराव माने (बाबा) महाराज युवा विद्यार्थी पुरस्कार देऊन डॉ सागर गोरड यांना वैकुंठवासी यशवंतराव माने महाराज यांच्या तेराव्या पुण्यतिथीदिनी गौरविण्यात आले .श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेत दि १६ जुलै रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी संस्थेचे संचालक बाळासाहेब माने, सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने , मुख्याध्यापक आर आर कट्टे, संभाजी पोळ कीर्तनकार अक्षय महाराज भोसले, माजी विद्यार्थी फाऊंडेशनचे अध्यक्ष रणजित भोसले, उपाध्यक्ष आशिष माने व सर्व सदस्य उपस्थित होते.श्री गाडगे महाराज व यशवंतराव महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून या सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली घराची परिस्थिती हलाखीची असताना बालवयातच वडिलांचे छत्र हरविल्याने मोठ्या संकटाची परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीवर मात करत खरातवाडी या खेड्यातील सागर गोरड यांनी गोंदवल्याच्या आश्रमशाळेत प्रवेश घेतला. परिस्थितीची जाण ठेऊन त्यांनी मोठ्या जिद्दीने व कष्टाने वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन केले. सध्या वडूज येथील भाग्यश्री क्लिनिकच्या माध्यमातून त्यांनी गोरंगरिबांसाठी वैद्यकीय सेवा सुरु ठेवलीय. याशिवाय गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करून त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी डॉ सागर गोरड यांचा प्रयत्न अविरतपणे सुरू आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गाडगे महाराज आश्रमशाळा माजी विद्यार्थी फाऊंडेशनने सन२०२०-२१ साठीचा युवा विद्यार्थी पुरस्कार बहाल केला. यावेळी श्री संत गाडगे महाराज आश्रमाशाळेचे संचालक बाळासाहेब माने म्हणाले, यशवंतराव माने बाबांच्या नावाने सुरू केलेला युवा विद्यार्थी पुरस्कार हा विद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. हा उपक्रम कायम सुरू ठेऊन विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी प्रोत्साहन द्यावे.यावेळी श्री निलेश भोसले, श्री लालासो मोरे,श्री झगडे, सीमा भोसले यांनीही मनोगत व्यक्त केली.फाऊंडेशनचे ऍड सागर लोंढे यांनी सूत्रसंचालन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त