सातारा जिल्ह्याची जलतरणपटू कुमारी वैष्णवी विनोद जगताप शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित

उडतरे : उडतरे गावाची सुकन्या कुमारी वैष्णवी विनोद जगताप हिला शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट  शिवछत्रपती पुरस्कार आज राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते कुमारी वैष्णवी विनोद जगताप हिला सन्मानित करण्यात आले. वैष्णवी ही आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहे तिला विविध जलतरण स्पर्धेमध्ये अनेक पुरस्कार भेटलेले आहेत त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन तिला  शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्काराबद्दल जगताप कुटुंबीयांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आणि  वैष्णवी चे अभिनंदन केले. तिच्या या स्पर्धेमध्ये उज्वल यशासाठी जगताप कुटुंबीयांनी अभिनंदन केले आणि हार्दिक शुभेच्छा दिल्या.पुणे येथे कामानिमित्त स्थायिक असलेले जगताप कुटुंबीय यांचे मूळ गाव उडतारे आहे.कुमारी वैष्णवी ने हा शिवछत्रपती पुरस्कार पटकावित सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक सन्मान मिळवून दिला आहे. कुमारी वैष्णवी चे  प्रख्यात हृदयरोग तज्ञ आणि वैष्णवी चे मामा डॉक्टर सोमनाथ मधुकर मल्लकमीर, उडतरे गावचे सरपंच आणि ग्रामस्थ यांनी  हार्दिक अभिनंदन करून उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त