पुसेगाव येथे चंद्रकांत दळवी यांची विशेष मुलाखत व विद्यार्थी संवाद मार्गदर्शन

पुसेगाव : खटाव तालुक्याचे सुपुत्र निढळ गावचे रहिवासी माजी आयुक्त श्री चंद्रकांत दळवी यांनी आपल्या आयुक्त पदाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या प्रशासनात नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून व आपल्या प्रयोगशील कर्तृत्वाने ठसा उमटविला असे खटाव तालुक्याचे सुपुत्र व पुणे विभागाचे माजी आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी यांची स्पर्धा परीक्षा, राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमात झालेले बदल या विषयांवर मुलाखत आणि विद्यार्थी संवाद मार्गदर्शन सत्र सोमवार दि. 23 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9. 30 वा. पुसेगाव येथे होणार असून पत्रकार आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत प्रश्न करून मा. दळवी साहेब प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. 
       चंद्रकांत दळवी हे सन 1983 मध्ये राज्यसेवेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेस सुरुवात केली. बुध्दीमतेच्या जोरावर सन 1995 मध्ये ते आय. ए. एस झाले. प्रशासनात एकूण 35 वर्षे सेवा केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला कशा पद्धतीने सामोरे जावे याची माहिती मिळावी. या पार्श्वभूमीवर पुसेगाव येथील सेवागिरी कार्यालयात या विशेष मुलाखत व विद्यार्थी संवाद सत्राचे आयोजन पुसेगाव पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. 
सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून सरकारी योजना कल्पकतेने राबविणारे अधिकारी म्हणून चंद्रकांत दळवी यांची महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला ओळख आहे. त्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यापासून ‘संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम, तंटामुक्ती अभियान, झिरो पेंडन्सी, डेली डिस्पोजल यासारखे विविध उपक्रम राबवून प्रशासनात गतिमानता आणली. जमाबंदी आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी सात बारा, जमिनींची ई - मोजणी, नकाशे याबाबत अनेक नाविन्यूपर्ण निर्णय घेतले. सातबारा ऑनलाईन करण्याचा निर्णयही त्यांनीच घेतला. याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला. सहकार आयुक्त, पुणे विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असताना प्रयोगशाली उपक्रम राबवून लोकाभिमुख काम केले. पुणे जिल्हाधिकारी असताना त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘झिरो पेंडन्सी’ डेली डिस्पोजल, या उपक्रमाची राज्य शासनाने दखल घेत त्यांना "उत्कृष्ट जिल्हाधिकारी" पुरस्कार दिला. प्रशासनात काम करीत असताना त्यांनी आपल्या पदाला न्याय दिला. याशिवाय त्यांनी त्यांच्या निढळ गावचा पूर्ण कायापालट केला. जलसंधारण, कृषी, ग्रामविकास, दुग्ध विकास, गावक-यांची आर्थिक उन्नती, शिक्षण अशी चौफेर प्रगती त्यांनी निढळमध्ये केली आहे. त्यामुळेच राज्यातील मोजक्‍या आदर्श गावांमध्ये निढळचाही उल्लेख होतो.
      स्पर्धा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धतीत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या परीक्षेस विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सामोरे जावे, यासाठी चंद्रकांत दळवी यांचेकडून विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तरी या संधीचा  विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुसेगाव पत्रकार संघाचे 
पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणारी प्रेरणादायी मुलाखत

 

चंद्रकांत दळवी यांच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये अनेक मुलाखती झाल्या आहेत. मात्र त्यांच्या मायभूमीमध्ये प्रथमच स्पर्धा परीक्षा, राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमात झालेले बदल या विषयावर मुलाखत  होत आहे. त्यामुळे या विशेष मुलाखतीकडे खटावसह सातारा जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. ही मुलाखत विद्यार्थी, शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक व युवतींसाठी दिशादर्शक ठरणारी प्रेरणादायी मुलाखत असणार आहे. 
 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त