महसूल विभागाच्या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सातारा : सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन स्वतंत्र कारवायांमध्ये महसूल विभागातील महसूल सहायक व एका खाजगी इसमाला दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अटक केली. या दोन कारवायांमध्ये 30 हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

पहिल्या कारवाईमध्ये विजय बाळू काळे (वय 41, महसूल सहाय्यक, वडूज तहसील कार्यालय. राहणार बळवंत पार्क शेजारी वडूज) व दुसर्‍या कारवाईमध्ये श्रीमंत गोविंद खाडे वय 45 राहणार तालुका खटाव अशी संबंधितांची नावे आहेत. पहिल्या कारवाईमध्ये विजय काळे यांनी तक्रारदाराकडे वडिलोपार्जित जमिनीचे वाटप पत्र करून मिळण्यासाठी व त्याबाबतचा आदेश पारित करणे यासाठी 12 हजार रुपये लाच मागितली होती. मात्र तडजोडी अंती दहा हजार रुपये घेण्याचे ठरले. काळे याला तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात दहा हजाराची लाच घेताना पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस हवालदार नितीन गोगावले, पोलीस हवालदार निलेश राजापुरे व विक्रम सिंह कणसे यांनी रंगेहाथ पकडले. पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दुसर्‍या कारवाईमध्ये तक्रारदार यांची वडीलोपार्जित जमिनीची आणि घराची वाटणी पत्र करून त्याची सातबार्‍यावर नोंद करण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची लाच श्रीमंत गोविंद खाडे यांनी तक्रादाराला मागितली. खाडे हा इनकुर, तालुका खटाव येथील रहिवासी आहे. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. कातरखटाव येथील इमारतीमधील तलाठी कार्यालयाच्या समोर लाच स्वीकारताना खाडे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस कॉन्स्टेबल कनिष्ठ साठे व निलेश येवले यांनी ही कारवाई केली.

सलग दोन कारवायांमुळे महसूल विभागांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त