डोळे येण्याची लक्षणे आढळल्यास त्वरीत आरोग्य विभागशी संपर्क साधा... जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे
Satara News Team
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
- बातमी शेयर करा

सातारा : लोकांना डोळे येण्याची लागण होत आहे. हा आजार गंभीर स्वरुपाचा नसून योग्य ती काळजी घेतल्यास व त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यास हा आजार लगेच बरा होतो. स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील डोळयाचा विभाग तसेच ग्रामीण स्तरावरती ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यासाठी पूर्णतः मोफत उपचार उपलब्ध आहेत, याचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले आहे.
डोळे येण्याची लक्षणे : डोळ्यांना सजू येणे. डोळ्यांमधून पाणी गळणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे. पापण्या चिकटवणे. डोळ्यातून चिकट पिवळा/पांढरा रंगाचा द्रव बाहेर येणे. डोळ्यांमध्ये आग होणे. डोकेदुखी, कान जवळचा भाग सुजणे किंवा कान दुखी, प्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रास.
डोळे येण्याचे कारण : डोळ्याचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे ॲडिनो व्हायरसमुळे होतो. डोळे येण्याचा प्रसार हे डोळे आलेल्या व्यक्तींच्या सहवासात आल्यामुळे संसर्ग वाढत जातो. डोळे आलेल्या व्यक्तीचा हात रुमाल, टॉवेल, चष्मा, ब्युटी क्रीम, काजळ किंवा साबण इत्यादी वस्तुंमुळे संसर्ग होऊ शकतो.
डोळे आल्यावर कोणते उपाय करतात : डोळ्याच्या डॉक्टरांकडे डोळ्यांची तपासणी करावी. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार करावा. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने दिवसातून तीन ते चार वेळा धुवावे व स्वच्छ कपड्याने पुसावेत.
डोळे आल्यावर कोणती काळजी घ्यावी : डोळे आल्यावर सतत डोळ्यांना हात लावू नये. डोळे पुसण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा. डोळ्यांना हात लावल्यावर लगेच साबण लावून हात धुवावेत. साधा कोणताही पण स्वच्छ असा चष्म्याचा वापर करावा. धूर, हवा, लाईटचा प्रकाश यांचा सहवास टाळावा.
शाळा, वसतिगृहे या संस्थात्मक ठिकाणी अशी लक्षणे अथवा साथ आली असेल तर डोळे आलेल्या व्यक्तीबाबत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन डॉ. करपे यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
संबंधित बातम्या
-
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
-
आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Tue 8th Aug 2023 12:45 pm
-
आठ तालुक्यात पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!
- Tue 8th Aug 2023 12:45 pm