बंधुत्व प्रतिष्ठान-२०२३ चे पुरस्कार जाहीर : चिटणीस, जगताप,गाडे,परिहार,खंडकर आदींना जाहीर

सातारा : बंधुत्व प्रतिष्ठानतर्फे सन-२०२३ चे पुरस्कार जाहीर झाले आहेत.विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.त्यांना ठिकठिकाणी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वितरीत करण्यात येणार आहे.
           सन १९९१ पासुन दरवर्षी एका व्यक्तीस/संस्थेस बंधुत्व पुरस्कार दिला जातो.यावर्षी, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक - अध्यक्ष शिरीष चिटणीस यांना जाहीर झाला आहे. याशिवाय, बंधुत्व पत्रकाररत्न - ज्येष्ट पत्रकार जितेंद्र जगताप, बंधुत्व ज्ञानजोती पुरस्कार - ज्येष्ट सामाजिक कार्यकर्त्या द्राक्षा खंडकर,बंधुत्व साहित्यिक कलारत्न - कवी सौ. शिल्पाताई चिटणीस,बंधुत्व आदर्श गायिका तथा माता पुरस्कार - सौ.कल्पनाताई कांबळे,बंधुत्व जीवन गौरवपुरस्कार - संबोधी प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे,धम्म प्रचार प्रसार पुरस्कार - जावली तालुका भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तात्या गाडे व सचिव भीमराव परिहार यांचा समावेश आहे.अशी माहिती संस्थापक अनिल वीर यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त