साताऱ्याजवळ शिरूरच्या कांदा व्यापाऱ्याची १८ लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने हातोहात लांबविली

सातारा : बेळगावहून पुण्याकडे जात असताना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका कांदा शेतकऱ्याची तब्बल १८ लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने हातोहात लांबविली. ही धक्कादायक घटना दि. ३ रोजी पहाटे सव्वातीन वाजता वाढे फाटा येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सतीश शंकर ढवळे (वय ३५, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) हे शेतकरी असून, कांदा विक्रीसाठी ते टेम्पो घेऊन बेळगावला गेले होते. कांदा विक्रीतून आलेली रोकड त्यांच्याजवळ त्यांनी ठेवली होती. त्यांच्यासोबत अन्य दहाजण होते. हे सर्वजण टेम्पोमधून लोणंदमार्गे शिरूरला निघाले होते. यावेळी वाढे फाट्यावर आल्यानंतर सर्वजण रात्री चहा पिण्यासाठी खाली उतरले. याचवेळी अज्ञात चोरट्याने टेम्पोमध्ये ठेवलेल्या बॅगेतील १८ लाख ९२ हजार ५०० रुपयांची रोकड तसेच मोबाइल, पाकीट, कागदपत्रे हातोहात लांबविली. 

चहा पिऊन आल्यानंतर सर्वजण पुढील प्रवासाला निघाले. लोणंदमार्गे जात असताना काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना बॅगेत पैसे नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी जिथं चहा पिला. त्या ठिकाणी परत येऊन चाैकशी केली. मात्र, त्यांचे पैसे काही सापडले नाहीत. चोरट्यांनी पाळत ठेवून त्यांच्या एवढ्या मोठ्या रकमेवर डल्ला मारल्याचे समोर आले. रात्री आठ वाजता त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने हे अधिक तपास करीत आहेत.

पाळत ठेवणारी टोळी कार्यरत..

वाढे फाट्यावर यापूर्वीही एका कार चालकाच्या बॅगमधून रोकड, मोबाइल, कागदपत्रे असा ऐवज चोरीस गेला होता. कारची काच फोडून चोरट्यांनी ऐवज चोरला होता. पुन्हा एकदा याच परिसरात अशाच प्रकारची घटना घडल्याने या ठिकाणी मोठी टोळी कार्यरत असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रवाशांवर पाळत ठेवून त्यांच्या वाहनातील ऐवज चोरून नेला जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला