काँग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर; कोल्हापुरातून शाहू महाराज, पुण्यातून रविंद्र धंगेकर रिंगणात
Satara News Team
- Thu 21st Mar 2024 09:30 pm
- बातमी शेयर करा
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील पहिली यादी जाहीर करण्यात आली असून सहा जागांवरती उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून नंदुरबार अमरावती नांदेड पुणे लातूर सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. नंदुरबारमधून गोवळ पडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार आहे.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 21st Mar 2024 09:30 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Thu 21st Mar 2024 09:30 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Thu 21st Mar 2024 09:30 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Thu 21st Mar 2024 09:30 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Thu 21st Mar 2024 09:30 pm
संबंधित बातम्या
-
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 21st Mar 2024 09:30 pm
-
प्रशांत खुसे-पाटील यांच्या रुपाने खटाव तालुक्याला मिळणार युवा नेतृत्व
- Thu 21st Mar 2024 09:30 pm
-
साताऱ्यात शिवसेना (उबाठा) आंदोलनाचा फुसका बार
- Thu 21st Mar 2024 09:30 pm
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Thu 21st Mar 2024 09:30 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Thu 21st Mar 2024 09:30 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Thu 21st Mar 2024 09:30 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Thu 21st Mar 2024 09:30 pm












