महायुतीचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ समशेरसिंह नाईक निंबाळकर मैदानात

फलटण :- माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण येथे फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला असून त्यांच्या प्रचाराला फलटण शहरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.  समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आज शुक्रवार पेठ, भैरोबा गल्ली, शंकर मार्केट, कसबा पेठ, दगडी पूल या परीसरात मतदारांच्या घरोघरी जाऊन माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागील पाच वर्षात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. निरा- देवघर, धोम -बलकवडी जोड कालवा प्रकल्प येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण करून ते पाणी खंडाळा तालुक्यापासून आदर्की ताथवडा, गिरवी अगदी फलटण तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत कालव्यामधून हा कालवा बारमाही करण्यासाठी काम सुरू असल्याचे यावेळी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.फलटण - लोणंद प्रत्यक्षात रेल्वे सुरू केली असून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला फलटण - बारामती रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात काम सुरू केले आहे. फलटणकरांसाठी आरटीओ ऑफिस सुरू केले असून जिल्हा सत्र न्यायालय फलटण येथे सुरू झाले आहे. तर फलटण - सातारा, फलटण- पुसेगाव, फलटण- सीतामाई घाट, कुळकजाई रस्ता, फलटण- दहिवडी रोड, फलटण -आसू रोड असे फलटण तालुक्यातील रस्त्याची कामे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून सुरू असल्याचे शेवटी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला