अजितदादा राजे गटाची राष्ट्रवादी मधून हकालपट्टी करणार का?- अशोकराव जाधव

माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीने दिलेल्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता फलटण मधील राजे गट यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला आहे.

मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात या विषयावर अजित पवार शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत विचार होणार का? असा सवाल अशोकराव जाधव यांनी उपस्थित केला आहे.

वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित पवार गट) सातारा जिल्हाध्यक्ष पद श्री.संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे असताना व संक्रातीच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वास साथ देत सत्तेत सहभागी होऊन फायदा घ्यायचा व युती धर्माचे पालन करायचे नाही हा मिठाचा खडा राजे गटाने महायुतीत टाकलेला आहे.

श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर व त्यांच्या गटाने विरोधात केलेल्या कामाची पक्ष व वरिष्ठ पातळीवर चौकशी करून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी,अन्यथा महाराष्ट्रात पुढील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी व विकासकामांना देणाऱ्या निधीबाबतही विचार करावा अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू व फलटण नगर परिषदेचे गट नेते अशोकराव जाधव यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला