पर्यंती येथे मायलेकीचा संशयास्पद मृत्यू, खून की आत्महत्या ?

म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल

सातारा : माण तालुक्यातील पर्यंती या गावातील मायलेकीचा राहत्या घरात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या की खून, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले नसून, घटनास्थळी डाॅग स्काॅड, फाॅरेन्सिक तज्ज्ञ कसून तपास करत आहेत. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे माण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आई संपताबाई लक्ष्मण नरळे (वय ७५), मुलगी नंदाबाई भिकू आटपाडकर (वय ५८, दोघीही रा. पर्यंती, ता. माण, जि. सातारा) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संपताबाई आणि नंदाबाई या दोघीच घरात राहत होत्या. गुुरुवारी सकाळी दोघींचेही मृतदेह संशयास्पद स्थितीत राहत्या घरात आढळून आल्यानंतर काही नागरिकांनी या घटनेची माहिती म्हसवड पोलिसांना दिली. 

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघींच्याही तोंडातून फेस येत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यांचा गळा आवळून खून झाला आहे की, त्यांनी आत्महत्या केली आहे, हे समोर आले नाही. दोन्हीही मृतदेह अद्यापही घटनास्थळीच आहेत. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे म्हसवड पोलिसांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला