आठ आमदारांपैकी दोन मंत्रिपद कोणाकोणाच्या गळ्यात पडणार

सातारा : सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत महाविकास आघाडीला नेस्तनाबूत करत दणदणीत विजय मिळून महायुतीने सातारा जिल्ह्याचा दबदबा राज्यात निर्माण केला. त्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उच्चांकी 1 लाख 42 हजारांच मताधिक्य मिळून मंत्रिपदावर दावेदारी सिद्ध केली आहे. शिवाय जयकुमार गोरे यांच्या नावाचीही चर्चा आहे. याशिवाय शिंदेसेनेचे शंभूराज देसाई यांचीही वर्णी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे यांच्या पैकी कोणाला संधी मिळणार आणि सातारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे येणार, याची उत्सुकता लागली आहे. 

 विधानसभा निवडणुकीचा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताच महायुतिकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे निवडून आलेले आठही आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत. सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री कोण, हे निश्चित झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्ह्यात प्रथमच भाजपाचे चार आमदार निवडून आले.शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीकडून दोन आमदार निवडून आले आहेत.

 कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे, दक्षिणमधून अतुल भोसले हे भाजपाचे तर फलटणमधून राष्ट्रवादीचे सचिन पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेत निवडून जात आहेत. तथापि, मंत्रिपदासाठी भाजपातून शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय शिंदेसेनेतून एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक शंभूराज देसाई यांची वर्णी निश्चित मानली जात आसली तरी मागील मंत्रीमंडळात त्यांना स्थान देण्यात आले होते त्या मुळेच महेश शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावाच लागेल.

 सातारा जिल्ह्यात आपली पकड राहण्यासाठी अजित पवार यांच्याकडून मकरंद पाटील यांचाही विचार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात दोन लाल दिवे येण्याची शक्यता पाहता पालकमंत्री कोण, याकडे लक्ष लागले आहे. साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे सर्वात सीनियर सातारा मतदारसंघातील शिवेंद्रसिंहराजे भोसले २००४ पासून सलग निवडून येत असून, ही त्यांची पाचवी टर्म आहे. स्वच्छ चेहरा, बेरजेचे राजकारण, राज्यातील उच्चांकी मताधिक्य, उदयनराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांची अनुकूलता, यामुळे त्यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त