सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाईस यश कराड शहर पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगिरी

 कराड  : कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील कुख्यात गुंडाने कराड शहरात विविध प्रकारचे 10 गुन्हे करुन त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक़ कारवाई करुनही तो प्रशासन व न्यायालयांचे आदेशाचे उल्लंघन करीत गुन्हे करुन शहरात दहशत माजवित होता त्याला अनुसरून कराड पोलिसांनी प्रस्ताव तयार केला होता  चौकशी व कार्यवाहीनंतर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द आदेश दिल्यानंतर तो फरार झाला 

आता कराड पोलिसांनी त्याचा शोध घेवुन त्यांस पुणे येथे ताब्यात घेवुन त्यांस सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आता त्याला स्थानबध्द करणेत आलेले आहे. जिल्हादंडाधिकारी सातारा यांचे सदर स्थानबध्द आदेशास सचिव  गृहविभाग, मंत्रालय, मुंबई यांचेसमक्ष सुनावणी होवुन त्यामध्ये एक वर्षाकरीता कुंदन जालींदर कराडकर, रा. गजानन हौसिंग सोसायटी, कराड याचा स्थानबध्द आदेश कायम कायम कऱण्यात आला आहे.

संपुर्ण कोल्हापुर पोलीस परिक्षेत्रामध्ये सातारा जिल्ह्यातुनच सदरची कारवाई करणेत आलेने यामध्येही कराड शहर पोलीसांनी आघाडी घेतली आहे. सदरचा एमपीडीए प्रस्ताव मंजुर झालेने कराड शहर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सराईत गुन्हेगारांच्या आवळण्याचे काम के. एन. पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त